आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तडप' अभिनेत्याचे विधान:घराणेशाहीमुळे इंडस्ट्रीत येणे सोपे झाले, पण मेहनत प्रत्येकाला करावीच लागते - अहान शेट्टी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहानने स्वतःला घराणेशाहीचे प्रोडक्ट संबोधले

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी याने नुकत्याच पार पडलेल्या आयफा अवॉर्ड्समध्ये 'तडप'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. पहिला पुरस्कार जिंकल्यानंतर तो घराणेशाहीबद्दल व्यक्त झाला. घराणेशाहीतूनच इंडस्ट्रीत आल्याची प्रांजळ कबुली अहानने दिली आहे. यासोबतच आपल्या कारकिर्दीवर घराणेशाहीचा काय परिणाम होतो हेही त्याने सांगितले आहे.

अहानने स्वतःला घराणेशाहीचे प्रोडक्ट संबोधले

अहान म्हणाला, "जेव्हा घराणेशाहीचा प्रश्न येतो तेव्हा मी ते स्वीकारतो. मी घराणेशाहीतूनच इंडस्ट्रीत आलोय. माझे वडील अभिनेते आहेत. मला नेहमीच अभिनेता व्हायचे होते आणि हो आमच्यासाठी हे सोपे आहे. मी हे अजिबात नाकारत नाही. पण शेवटी प्रत्येकाला मेहनत करावी लागते. या इंडस्ट्रीत येण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. या इंडस्ट्रीचा एक भाग असल्याचा मला खूप आनंद आणि सन्मान वाटतो. पण मला याचा फायदा उचलायचा नाही. त्यामुळे मी फक्त मेहनत करत आहे."

अहानचा आईवडिलांना वाटतो अभिमान
आयफा पुरस्कार मिळाल्यावर आई माना शेट्टी आणि वडील सुनील शेट्टी यांची काय प्रतिक्रिया होती, याबाबातही अहानने सांगितले. याबद्दल बोलताना अहान म्हणाला, "जेव्हा मी पुरस्कार स्वीकारत होतो, तेव्हा माझे वडील माझ्या शेजारी उभे होते, मी पाहत होतो की ते खूप भावूक झाले होते आणि त्यांचे डोळे पाणावले होते. आणि माझे नाव घेण्याआधीच आईने माझा हात अगदी घट्ट पकडला होता. माझे आईवडील खूप आनंदी होते आणि मला आशा आहे की त्यांना माझा अभिमान वाटला आहे."

अहानने 'तडप'मधून केली करिअरला सुरुवात
अहान शेट्टीने 'तडप' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या अॅक्शन ड्रामा चित्रपटातील अहानच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारियाही मुख्य भूमिकेत होती. याचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे. अहानने याआधी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, चित्रपटात वजन वाढवण्यासाठी तो दिवसातून 11 ते 12 जेवण करायचा.

बातम्या आणखी आहेत...