आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नामकरण सोहळा:सैफ-करीनाच्या बाळाचे आज होणार बारसे, धाकट्या भावासाठी भेटवस्तू घेऊन पोहोचली सारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना तिच्या दुसर्‍या मुलाचे नाव फैज ठेवू शकते

सैफ अली खान आणि करीना कपूर पुन्हा एकदा आईबाबा झाले आहेत. 21 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये करीनाने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. 2 दिवसानंतर करीनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि नवजात बाळासह ती आपल्या नवीन घरी पोहोचली. आता बातमी आहे की, आज करीना आणि सैफच्या त्यांच्या नवीन घरात आपल्या लहान मुलाचे बारसे करणार आहेत. यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या फंक्शनमध्ये चिमुकल्या बाळाचे नाव ठेवले जाणार आहे.

धाकट्या भावासाठी गिफ्ट्स घेऊन पोहोचली सारा

सैफिनाच्या घराबाहेर सजावट देखील करण्यात आली आहे. चाहते, हितचिंतक, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून भेटी येऊ लागल्या आहेत. सारा अली खान देखील तिच्या धाकट्या भावासाठी ब-याच भेटवस्तू घेऊन पोहोचली आहे. तिचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वृत्तानुसार सारा, सोहा अली खान आणि कुणाल खेमू याकार्यक्रमाची तयारी करत आहेत.

करीना तिच्या दुसर्‍या मुलाचे नाव फैज ठेवू शकते

करीनाच्या धाकट्या मुलाचे छायाचित्र अद्याप समोर आलेले नाही. चाहते बेबी बॉयची पहिली झलक बघण्यास आतुर आहेत. चाहत्यांनी बाळाच्या नावाबद्दल तर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. करीनाने तिच्या दुसर्‍या मुलाचे नाव फैज ठेवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तैमूरच्या जन्माच्या वेळी सैफने त्याच्यासाठी फैज हे नाव सुचवले होते. मात्र करीनाला तैमूर नाव पसंत पडले होते. त्यामुळे दुस-या बाळासाठी सैफच्या पसंतीच्या नावाची निवड होऊ शकते.

सैफिना नव्या घरात शिफ्ट झाले आहेत
दुसर्‍या मुलाच्या जन्मापूर्वीच सैफिना म्हणजेच सैफ आणि करीना त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. त्याचे हे घर खूप मोठे आहे. या घरात एक आलिशान लायब्ररी, स्विमिंग पूल आणि एक खास नर्सरी देखील तयार केली गेली आहे. जिथे तैमूर आपल्या लहान भावासोबत वेळ घालवू शकेल.

तैमूरसारखा दिसतो दुसरा मुलगा
करीनाच्या धाकट्या मुलाचे छायाचित्र अद्याप समोर आले नाही. चाहते बेबी बॉयच्या पहिल्या झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, बेबोचा धाकटा मुलगा तैमूरसारखा दिसतो. ते म्हणाले, 'मला सर्व मुले एकसारखी दिसतात. पण आमच्या घरी सर्वजण बाळ तैमूरसारखे दिसत असल्याचे म्हणत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...