आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:रेमो डिसूझाच्या प्रकृतीत सुधारणा, नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी दिली रेमोच्या प्रकृतीची माहिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता रेमो डिसूझाची प्रकृती स्थिर आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करुन त्याच्या हृद्यातील ब्लॉकेजेस काढले आहेत. शस्त्रक्रियेनंतर पुढील 24 तास खूप महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती रेमोची पत्नी लिझेलने दिली होती. आता रेमोचा खास मित्र व नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक अहमद खान याने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

बातमी ऐकून धक्का बसला - अहमद खान
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अहमद खान म्हणाला, जेव्हा रेमोला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समजली, तेव्हा मला धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेल्याचे मला फोनवर समजले. आम्ही सर्वजण चिंतेत होतो. पण आता त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या तो आयसीयूत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.'

रेमो फिटनेसची खूप काळजी घेतो
रेमो फिटनेसची खूप काळजी घेतो असे अहमदने सांगितले. तो पुढे म्हणाला, 'जो व्यक्ती त्याच्या प्रकृतीबद्दल आणि फिटनेसबद्दल इतकी काळजी घेतो, त्याच्यासोबत असे घडावे म्हणजे तुमच्या आत्मविश्वासालाच मोठा धक्का बसतो'

कोण आहे रेमो डिसुजा?
रेमो डिसूझाचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव हे त्याचे खरे नाव आहे. त्याच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझाने गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. ध्रुव आणि गबिरिल ही त्याच्या मुलांची नावे आहेत.

रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. नृत्य दिग्दर्शक म्हणून 1995 मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. याआधी तो बॅकग्राउंड डान्सर होता. 2000 मध्ये त्याने 'दिल पे मत ले यार' या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन केले होते. 'तहजीब', 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'ये जवानी है दीवानी', 'एबीसीडी 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'कलंक' चित्रपटासाठी त्याला पुरस्कारही मिळाले आहेत.

कोरिओग्राफर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर त्याने दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. 'फालतू' या चित्रपटासह त्याने 2013 मध्ये आलेल्या ‘एबीसीडी’ या डान्सवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केले. याशिवाय 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हे देखील त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. याशिवाय तो डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा आणि डान्स प्लस या शोचा परीक्षकही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser