आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायल रोहतगीला अटक:पायलवर अहमदाबादमध्ये सोसायटीच्या अध्यक्षांना धमकावणे, शिवीगाळ केल्याचा आरोप; शेजार्‍यांनीही दिली होती तक्रार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदाबाद येथे पायल रोहतगी हिला अटक झाली आहे.

सतत वादात राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पायलवर ती राहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांशी झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरल्याचा आरोप आहे. मात्र नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली होती. एवढंच नाही तर पायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी आणि लहान-लहान गोष्टींवरुन सोसायटीतील लोकांशी भांडत असल्याचा आरोप आहे.

मीटिंगमध्ये अध्यक्षांसोबत गैरवर्तन केले होते
अध्यक्ष आणि सोसायटीच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पायल रोहतगी हिला अहमदाबाद सॅटेलाइट पोलिसांनी अटक केली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, 20 जून रोजी सोसायटीत बैठक झाली. रोहतगी ही या मीटिंगची सदस्य नव्हती. असे असूनही, ती मीटिंगमध्ये पोहोचली आणि बोलू लागली. जेव्हा अध्यक्षांनी तिला अडवले तेव्हा पायलने सर्वांसमोर त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावरही व्यक्त केला होता संताप
यानंतर पायलने सोशल मीडियावरही आपला राग काढला होता. एका पोस्टमध्ये पायलने अध्यक्षांचा नावाचा उल्लेख करत त्यांच्याविरूद्ध अश्लील भाषा वापरली होती. मात्र तिच्या या पोस्टवर काही कमेंट आल्यानंतर तिने ही पोस्ट डिलीट केली होती.

मुलांना खेळू देत नाही पायल

सोसायटीचे सदस्य आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले जयेश यांच्या म्हणण्यानुसार, पायल रोहतगीची वागणूक मुळीच चांगली नाही. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून कोणाशीही भांडते. एवढेच नव्हे तर ते सोसायटीतील मुलांनादेखील ती सोडत नाहीत. मुले सोसायटी कंपार्टमेंटमध्ये खेळताना किंवा मस्ती करताना दिसल्यास पायल त्यांच्यावरही सतत ओरडत असते, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...