आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?:एम्सच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये आज होणार स्पष्ट, ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेले मिरांडासह तिघे जामिनासाठी आज हायकोर्टात घेणार धाव

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एम्सच्या डॉक्टरांचे पॅनेल आज व्हिसेरा रिपोर्टसंदर्भात अंतिम बैठक घेणार.
  • सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि अब्दुल बासित यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य आज समोर येऊ शकते. एम्सचा व्हिसेरा रिपोर्ट आज येऊ शकतो, त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे उघड होईल. रिपोर्टसंदर्भात एम्सच्या डॉक्टरांचे पॅनेल आज अंतिम बैठक घेईल. दरम्यान, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि अब्दुल बासित यांनी त्यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आज दुपारी सुनावणी होऊ शकते.

  • हा रिपोर्ट फक्त 20 टक्के व्हिसेरावर आधारित आहे

सुशांतच्या 20 टक्के व्हिसेरावर आधारित हा अहवाल असेल, तर उर्वरित 80 टक्के व्हिसेरा हे मुंबई पोलिसांकडून तपासले गेले आहेत. व्हिसेरा रिपोर्टमध्ये सुशांतला विषबाधा झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे.

  • एम्सच्या तज्ज्ञांनी प्रत्येक अँगलने तपासणी होणार असल्याचे म्हटले होते

या प्रकरणात चौकशी समितीचे प्रमुख असलेले एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, "आम्ही हत्या झाल्याच्या सर्व संभाव्य कोनातून ही चौकशी करू. आमची टीम सुशांत सिंह राजपूतच्या शरीरावरील जखमेच्या नमुन्याचे विश्लेषण करेल. सुरक्षित ठेवलेल्या व्हिसेराची तपासणी केली जाईल आणि सोबतच सुशांतला दिलेल्या नैराश्येच्या औषधांचीही पडताळणी केली जाईल."

  • फॉरेन्सिक एक्सपर्टने क्राइम सीन खराब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले

एम्सच्या फॉरेन्सिक विभागाकडे वैद्यकीय-कायदेशीर सल्ल्यासाठी सीबीआयने संपर्क साधला. रिपब्लिक टीव्हीशी बोलताना डॉ. सुधीर गुप्ता यांनी ज्या प्रकारे गुन्हेगारीचे दृश्य खराब झाले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. डॉ. गुप्ता म्हणाले होते की, क्राइम सीनची स्थिती कायम राखली गेली नव्हती आणि ते पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले होते.

  • सीबीआयची एसआयटीही अहवाल देईल

याशिवाय सीबीआयचे विशेष तपास पथक ज्यात नुपूर प्रसाद, अनिल यादव यांचा समावेश आहे, तेदेखील आपल्या वरिष्ठांना रिपोर्ट देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही अधिकारी त्यांचा संक्षिप्त तपास अहवालही सादर करतील जेणेकरून त्यांना या प्रकरणात लीड मिळू शकेल. सीबीआयच्या पथकाने 22 ऑगस्टपासून जे काही पुरावे गोळा केले आणि जबाब नोंदवले आहेत त्याचा तपशीलही देतील.

  • एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात आणखी 5 जणांना पकडले

सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) कारवाई सुरूच आहे. गुरुवारी एनसीबीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 5 जणांना ताब्यात घेतले. सध्या एनसीबी कार्यालयात सर्वांची चौकशी केली जात आहे. या छाप्यात एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भातीलअधिक माहिती आज अधिकृतपणे समोर येऊ शकते.