आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन:हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टीवर शोककळा

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले. 20 नोव्हेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने तिने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून एंड्रिला शर्मा कोमात होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी एंड्रिला शर्माला सीपीआर देण्यात आला होता

एंड्रिलाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. 15 नोव्हेंबरला तिला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर तिने प्रकृती आणखीनच बिघडली. तिला सीपीआरही देखील देण्यात आला होता. त्यानंतर ती अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होती. एंड्रिलाच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

एंड्रिलाच्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये तिच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले आहे. एंड्रिलाच्या डोक्याच्या ज्या भागावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्याच्या विरुद्ध बाजूस या गाठी होत्या. या अगोदर एंड्रिलाला 2 वेळा कर्करोग देखील झाला होता. काही दिवसांपूर्वी तिला पक्षाघाताचा झटका आला होता, त्यामुळे तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या.

2 वेळेस कर्करोगावर केली आहे मात

एंड्रिला शर्माला दुसऱ्यांदा कॅन्सर झाला तेव्हा तिने हार मानली नाही. तिची कॅन्सरची शास्त्रक्रीया पूर्ण झाली होती. शास्त्रक्रीया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कर्करोगमुक्त घोषित केले. या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर एंड्रिलाने पुन्हा अभिनयातही पुनरागमन केले होते, मात्र तिची तब्बेच अचानक बिघडल्याने तिला परत एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोण आहे एंड्रिला शर्मा?

एंड्रिला शर्माबद्दल बोलायचे झाले तर ती बंगाली सिनेमात जास्त पाहायला मिळाली. 'झूमर' या टीव्ही शोमधून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक लोकप्रिय शो केले. Andrila ने नुकतेच 2 OTT प्रोजेक्ट देखील केले.

बातम्या आणखी आहेत...