आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री एंड्रिला शर्माची स्ट्रोकनंतर प्रकृती खालावली:मेंदूत झाल्या रक्ताच्या गुठळ्या, डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय अभिनेत्री ऐंड्रिला शर्मा सध्या रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला दोनदा कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र कॅन्सरला मात दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एंड्रिलाला स्ट्रोक आला असून त्यामुळे तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या आहेत.

रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे एंड्रिला
एंड्रिला सध्या हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. एंड्रिलाची अवस्था ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

नुकतीच कॅन्सरशी लढाई जिंकली

दुसर्‍यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यावरही एंड्रिला शर्माने हार मानली नाही. तिच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादरम्यान तिच्यावर किमोथेरपीचे सेशनही झाले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला कॅन्सरमुक्त घोषित केले. त्यानंतर एंड्रिलाने अभिनयातही पुनरागमन केले होते, मात्र अचानक तिची तब्येत पुन्हा बिघडली.

कोण आहे एंड्रिला शर्मा?

एंड्रिला शर्मा ही प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. तिने 'झूमर' या टीव्ही शोमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय शो केले. एंड्रिलाने अलीकडे 2 OTT प्रोजेक्ट्सदेखील केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...