आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थ्रोबॅक:ऐश्वर्या राय बच्चनला MISS WORLD होऊन झाली 26 वर्षे, वयाच्या 21 व्या वर्षी 'या' प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकला होता किताब

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 नोव्हेंबर 1994 रोजी वयाच्या 21 वर्षी ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावी केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 19 नोव्हेंबर 1994 रोजी वयाच्या 21 वर्षी तिने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावी केला होता. ती त्यावेळी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती.

दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी एन्टरटेन्मेंट सेंटरमध्ये 87 देशांच्या मॉडेल्सना पिछाडत ऐश्वर्याने मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची बॅसेतस्ना मॅकगालेमे पहिली रनरअप आणि व्हॅनेज्युएलाची इरिन फेरीरा दुसरी रनरअप ठरली होती.

मिस वर्ल्ड 1993 ने डोक्यावर सजवला ताज
ऐश्वर्या रायच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज 1993च्या मिस वर्ल्ड जमॅकाची रहिवासी लीसा हन्नाने सजवला होता. मिस वर्ल्डचा ताज डोक्यावर सजवणारी ऐश्वर्या दुसरी भारतीय मॉडेल आहे. यापूर्वी 1966मध्ये मुंबईची रीता फारियाने हा पुरस्कार जिंकला होता.

'या' प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकला होता किताब
मिस वर्ल्डमध्ये कोणती वैशिष्ट्ये असायला हवी? असा प्रश्न मिस वर्ल्डच्या ग्रॅण्ड फिनालेत ऐश्वर्या रायला विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली होती, ''आतापर्यंत आम्ही जितके मिस वर्ल्ड पाहिली आहेत. त्या सर्वांमध्ये क्षमा भाव पाहायला मिळाला. त्यात केवळ मोठ्या लोकांसाठी क्षमा नव्हती तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठीही क्षमा होती. आम्ही असे लोक पाहिले की जे लोक राष्ट्रीयता आणि रंगाच्या पलिकडे पाहू शकतात. आम्हाला त्यांच्या पेक्षाही अधिक पाहण्याची गरज आहे. तरच एक खरी मिस वर्ल्ड उठून दिसेल. एक खरा माणूस म्हणून दिसेल.''

सर्वात यशस्वी मिस वर्ल्ड
ऐश्वर्या राय बच्चनला 2014च्या मिस वर्ल्ड पीजेंटदरम्यान सर्वात यशस्वी मॉडेलचा सन्मान देण्यात आला होता. डिसेंबर 2014मध्ये झालेल्या स्पर्धेत तिला चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...