आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हीरा मंडी':आलिया भट्टच्या 'हीरा मंडी'मध्ये होऊ शकते ऐश्वर्या राय बच्चन-माधुरी दीक्षितसह या मोठ्या अभिनेत्रींची एंट्री

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भन्साळींनी या चित्रपटासाठी नेटफ्लिक्ससोबत केली हातमिळवणी

संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'हीरा मंडी'मध्ये बड्या अभिनेत्रींची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहे. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, मनीषा कोईराला, विद्या बालन आणि परिणीती चोप्रा या अभिनेत्री आलियासह या चित्रपटात दिसू शकतात. या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी स्वतः कास्टिंग करत आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहाय्यक विभू पुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विभू यांनी यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या 'गुजारिश' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

भन्साळींनी या चित्रपटासाठी नेटफ्लिक्ससोबत केली हातमिळवणी
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. ते आता हा पीरियड ड्रामा वेब फिल्मच्या रुपात बनवतील. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याचबरोबर 'हीरा मंडी' चे शूटिंग 2021 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होऊ शकते.

हा चित्रपट रेड लाईट एरियाच्या संस्कृतीवर आधारित आहे
रिपोर्टनुसार, 'हिरा मंडी' या चित्रपटाची कथा लाहोर शहरातील एका रेड लाइट एरियातील महिलांच्या स्थितीवर आधारित आहे. या चित्रपटात येथे राहणा-या महिलांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...