आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांपासून दूर होती. मात्र आता ती पुन्हा एकदा शूटिंगवर परतली आहे. तिने मणिरत्नम यांचा ‘पोन्नीईन सेल्वन’ हा चित्रपट साइन केला असून या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. सध्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी येथे चित्रीकरण सुरु आहे. या सेटवरुन ऐश्वर्याचा पहिला फोटो समोर आला आहे.
हा फोटो या चित्रपटातील ती को-स्टार अरुशिमा वार्ष्णेय हिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या विनामेकअप आणि ग्रे कलरच्या हुडीत दिसतेय. अरुशिमाच्या या सेल्फीत ऐश्वर्याकारमध्ये बसलेली दिसतेय. फोटो शेअर करुन अरुशिमाने लिहिले, ‘पोन्नीईन सेल्वन’च्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन मॅमच्या चेह-यावरुन माझी नजर हटत नाही.
हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात ऐश्वर्यासह अमिताभ बच्चन, विक्रम कार्थी, त्रिशा, जयम रावी आणि शोभिता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.