आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरून:ऐश्वर्या राय बच्चनने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली इमोशनल नोट, थ्रोबॅक फोटो केला शेअर

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2017 मध्ये त्यांचे निधन झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने तिचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा एक जुना फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोसह तिने एक भावनिक नोट लिहिली आहे. "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझे प्रिय डॅडी-अज्जा. लव्ह यू इटर्नली",' असे कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोसह दिले आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्याचे वडील एक स्मितहास्य करताना दिसत आहेत. ऐश्वर्याचे वडील कृष्णा राज हे जीवशास्त्रज्ञ होते. 2017 मध्ये मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते.

मुलगी आराध्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले होते ऐश्वर्या-अभिषेक

अलीकडेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांची मुलगी आराध्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते. 16 नोव्हेंबरला आराध्या 10 वर्षांची झाली. तिथे हे तिघे अमिला नावाच्या आलिशान रिसॉर्टमध्ये थांबले होते. अमिला रिसॉर्टमध्ये अनेक प्रकारले व्हिला आहेत. यात रीफ वॉटर पूल व्हिला, सनसेट वॉटर पूल व्हिला, लगून वॉटर पूल व्हिला आणि मल्टी बेडरूम रेसिडेन्ससह विविध व्हिलांचा समावेश आहे. येथे अनेक व्हिलांमध्ये प्रायव्हेट पूल आणि सी व्यूचा समावेश आहे. येथील एका रात्रीचे भाडे 76,000 पासून ते 14 लाख रुपयांपर्यंत आहे.

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे ती लवकरच मणिरत्नम यांच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहे. पोन्नियिन सेल्वन असे या चित्रपटाचे नाव असून यात तिची दुहेरी भूमिका आहे.

बातम्या आणखी आहेत...