आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर डंका:‘पोन्नियिन सेल्वन 2’ची जगभरात केली 300 कोटींची कमाई, 'रावणनंतर' ऐश्वर्या-विक्रमचा तिसरा चित्रपट

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा ऐतिहासिक चित्रपट 28 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाचा दुसरा भागदेखील तिकीटबारीवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने महिन्याभराच्या आतच बॉक्स ऑफिसवर तब्बल 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपटाचा वर्ल्डवाइड कमाईचा आकडा आहे.

दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाच्या कमाईची माहिती देता लाइका बॅनरने ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले, 'PS-2 बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने 300 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.'

कृष्णमूर्ती यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' या कादंबरीवर आधारित आहे चित्रपट
'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट 2022 मध्ये आलेल्या 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीच्या तीन भागांवर आधारित होता. तर, 'पोन्नियिन सेल्वन 2' उर्वरित दोन भागांवर आधारित आहे.

'रावण'नंतर ऐश्वर्या-विक्रमचा ऑनस्क्रीन तिसरा चित्रपट
या चित्रपटातून ऐश्वर्या-विक्रम यांनी तिसऱ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रावण' या चित्रपटातील ऐश्वर्या-विक्रमच्या जोडीला समीक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, तृषा, जयराम रवी, कार्ती, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलीपाल, प्रकाश राज, जयम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिवन, विक्रम प्रभू या कलाकारांनी चित्रपटात चोल साम्राज्याची कथा पुढे नेली आहे. अभिनेता कमल हसन यांनी चित्रपटाचे नॅरेशन दिले आहे. ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती मणिरत्नम यांच्या मद्रास टॉकीज आणि सुबास्करन यांच्या लायका प्रोडक्शनने संयुक्तपणे केली आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या राय दुहेरी भूमिकेत
चित्रपटात जयम (रवी मोहन) राजराजा चोला 1 च्या भूमिकेत आहे तर ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत आहे. ऐश्वर्या पझुवूरची राणी नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी देवी या दोघींच्या भूमिकेत आहे. तर तृषाने चोल राज्याची राजकन्या कुंदवाईची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

'पोन्नियिन सेल्वन'चा अर्थ
'पोन्नियिन सेल्वन' हा शब्द तमिळ भाषेतील आहे, ज्याचा अर्थ 'कावेरी नदीचा पुत्र' आहे. कावेरी नदीला तमिळमध्ये पोन्नी म्हणतात. असे मानले जाते की जेव्हा राजराजा पहिला 5 वर्षांचा होता तेव्हा तो कावेरीमध्ये पडला आणि कावेरीनेच त्याला वाचवले. म्हणून त्याचे नाव पोन्नियिन सेल्वन म्हणजेच 'कावेरी नदीचा पुत्र' असे पडले.