आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइट-कॅमेरा-अ‍ॅक्शन:ऐश्वर्या रायने सुरु केले 'पोन्नियिन सेल्वन' या फिल्मचे चित्रीकरण, 500 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐश्वर्या राय बच्चन हिने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय 2018 मध्ये फन्ने खां या चित्रपटात झळकली होती. आता दोन वर्षानंतर ती पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हा चित्रपट एक हिस्टोरिकल ड्रामा असून तो दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. इतर ए-लिस्टर्सप्रमाणे आता ऐश्वर्या राय बच्चन हिने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

ऐश्वर्याच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुड्डुचेरीमध्ये सुरु असून तिच्यासह अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी हिनेसुद्धा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या राय या चित्रपटात नंदिनी आणि मंदाकिनी देवीच्या दोन वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसणार आहे.

चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिलीज
अलीकडेच चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यात चित्रपटाचे शीर्षक पीएस (पोन्नियिन सेल्वन) - पार्ट वन असे लिहिले आहे. पोस्टरनुसार हा चित्रपट दोन भागात तयार होणार आहे, ज्याचा पहिला भाग 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन व्यतिरिक्त कार्थी विक्रम, तृषा कृष्णा, प्रकाश राज, जयाराम, जयम रवि, ऐश्वर्या लक्ष्मी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मद्रास टॉकीज आणि लिका प्रॉडक्शन यांनी केली असून संगीतकार ए.आर. रहमान हे आहेत.

मणिरत्नम यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, काल्कि कृष्णमूर्ती यांच्या 1955 साली आलेल्या 'पोन्नियिन सेल्वन' या कादंबरीवर आधारित आहे. दक्षिणेतील एका पॉवरफुल राजावर आधारित ही कादंबरी आहे. या चित्रपटाचे 75 टक्के शूटिंग पूर्ण झाले असल्याचे मणिरत्नम यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. निर्माते हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. वृत्तानुसार, हा ड्रीम प्रोजेक्ट 500 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...