आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पोन्नियन सेल्वन-1'चा ट्रेलर लाँच:: कार्यक्रमात ऐश्वर्या राय पडली रजनीकांत यांच्या पाया, मणिरत्नम यांना मारली मिठी

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिरत्नम यांचा ऐतिहासिक चित्रपट 'पोन्नियन सेल्वन-1' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला साऊथ इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित होते. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने सुपरस्टार रजनीकांत यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला.

या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ऐश्वर्याने आधी चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांना मिठी मारली आणि नंतर रजनीकांत यांची भेट घेतली. हा चित्रपट 10व्या शतकातील चोल साम्राज्याच्या शक्ती आणि संघर्षाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

ऐश्वर्याने रजनीकांत यांच्यासोबत 2.0 आणि एदिरन या चित्रपटात एकत्र काम केले होते. ब-याच दिवसांनी रजनीकांत यांना भेटून ऐश्वर्या खूप आनंदी दिसत होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...