आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखी हुबेहुब दिसत असलेल्या आणखी एका तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या तरुणीचे नाव आमना इमरान असून ती मुळची पाकिस्तानची आहे आणि एक ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव असेलल्या आमनाच्या अकाउंटवर असे अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये ती केवळ ऐश्वर्यासारखी पोज देत नाहीये तर बर्याच अंशी ती तिच्यासारखीही दिसतेय. तिचे व्हायरल फोटो बघून सोशल मीडिया यूजर्स तिला ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हणत आहेत.
आमना स्वत: ला ऐश्वर्याची लूक अ लाइक मानते
सोशल मीडियावर साधारण 4 हजार लोक आमनाला फॉलो करतात. ती स्वत:ला ऐश्वर्याची लूक अ लाइक म्हणते. त्यामुळेच तिने तिच्या बायोमध्ये “मीडिया - ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी” असे लिहिले आहे. शांतता, प्रेम, ऐक्य, सहिष्णुता आणि नम्रतेवर तिचा विश्वास असल्याचे तिने बायोमध्ये सांगितले आहे.
आमना ही पहिली मुलगी नाही जी साधारण ऐश्वर्यासारखी दिसत आहे. 2005 मध्ये जेव्हा स्नेहा उलालने 'लकी : नो टाइम फॉर लव्ह' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा अनेक रिपोर्टमध्ये स्नेहा ऐश्वर्यासारखी दिसत असल्याने सलमान खानने तिला सिनेमात आणले होते, अशी चर्चा रंगली होती.
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकची देखील तुलना ऐश्वर्या रायसोबत केली जाते. मानसीने असे अनेक फोटोशूट केले होते ज्यामध्ये ती ऐश्वर्यासारखी दिसत होती. त्यावेळी मानसीने ऐश्वर्याची स्टाईल कॉपी केली अशा चर्चा रंगल्या होत्या.
अमृता अमूज ही तरुणीदेखील ऐश्वर्या रायसारख्या लूकमुळे टिकटॉकवरही खूप लोकप्रिय झाली आहे.
इराणी मॉडेल महालगा जाबेरीनेही ऐश्वर्यासारख्या दिसण्यामुळे चर्चा एकवटली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.