आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

COVID नियमांचे उल्लंघन:अजय देवगणच्या ‘मेडे’च्या प्रॉडक्शनशी संबंधित 12 जणांविरूद्ध गुन्हा दाखल, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग आणि मास्क न घातल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सनसिटी ग्राउंडमध्ये जो सेट तयार होतोय, त्यात प्लेन क्रॅशचा एक सीन चित्रीत होणार होता.

अभिनेता आणि निर्माता अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसमधील 12 कर्मचार्‍यांवर कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे क्रू मेंबर्स वसईच्या सनसिटी परिसरात 'मेडे' चित्रपटाच्या सेटची निर्मिती करत होते. त्यांच्यावर गर्दी जमवणे आणि लॉकडाउनचे नियम मोडल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनसिटी ग्राऊंडवर तयार करण्यात आलेल्या सेटमध्ये विमान अपघाताचे दृश्य शूट केले जाणार होते. वसई तहसीलदारांकडून परवानगी घेतल्याचा चित्रपटाच्या क्रूचा दावा आहे. अजय देवगण ‘मेडे’ हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. यात स्वतः अजय एका महत्त्वाच्या भूमिकेत असून त्याच्यासह अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंह आणि अंगिरा धर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये अजय देवगणच्या कर्मचा-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गार्डेनिया स्टुडिओचे लोकेशन मॅनेजर दानिश जैस्वाल (वय 35) यांचाही समावेश आहे. माणिकपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक भाऊसाहेब अहिरे यांनी सांगितल्यानुसार, चौकशीदरम्यान त्यांनी अनेकांना कोविड -19 चे नियम तोडताना आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग करताना पकडले.

माणिकपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब अहिरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पथकाने छापा टाकला तेव्हा एकाही कर्मचा्याने मास्क घातला नव्हता.
माणिकपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब अहिरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पथकाने छापा टाकला तेव्हा एकाही कर्मचा्याने मास्क घातला नव्हता.

कोणत्याही कर्मचार्‍यांनी मास्क घातला नव्हता
अहिरे यांनी सांगितले की, सनसिटी मैदानावर तयार होणा-या सेटवर 15 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यापैकी एक किंवा दोन जण वगळता कोणीही मास्क घातलेला नव्हता. ज्यांनी मास्क घातला होता, त्यांनी तो हनुवटीच्या खाली ठेवला होता. नियमांचे उल्लंघन झालेले बघून आम्ही लोकेशन मॅनेजर जयस्वाल यांना बोलावले. तहसीलदारांकडून शूट करण्याची परवानगी घेतल्याचे त्यांनी सांगितले. अजय देवगण शूटिंगसाठी येथे येत असल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिले.

या कलमांखाली गुन्हा दाखल
यानंतर आम्ही कलम 188 (सरकारने घालून दिलेल्या सूचनांचे उल्लंघन) आणि आयपीसीच्या 269 (जीवघेण्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा आरोप) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्ही त्यांना तेथून सेट हटवण्यास सांगितले आहे.

आजही स्टाफ ग्राऊंडवर उपस्थित आहे. मात्र सर्व जण मास्क घालून काम करत आहेत.
आजही स्टाफ ग्राऊंडवर उपस्थित आहे. मात्र सर्व जण मास्क घालून काम करत आहेत.

हा वाद वाढल्यानंतर वसईचे तहसीलदार उज्ज्वल भगत यांनी सांगितले की, आम्ही निर्धारित फी घेतल्यानंतरच केवळ मैदान भाड्याने दिले होते. शूटिंग किंवा सेट बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. यासाठी त्यांनी स्थानिक पोलिस आणि महापालिकेची परवानगी घ्यायला हवी होती. 'मेडे' चित्रपटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'सध्या कोणाविरूद्धही गुन्हा दाखल झाल्याची आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही. आमचे शूटिंग ठरलेल्या वेळापत्रकात होईल.'

बातम्या आणखी आहेत...