आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर आऊट:अजय देवगणची डेब्यू वेब सीरिज 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस'चा ट्रेलर रिलीज, 4 मार्चपासून OTT वर होणार स्ट्रीम

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रुद्र' हा 'लुथर'चा हिंदी रिमेक आहे

अभिनेता अजय देवगण आणि राशी खन्ना स्टारर 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वतः अजय देवगणने या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "अंधाराने वेढलेला, मी प्रकाशात न्याय देण्यासाठी तयार आहे. 'रुद्र'चे सर्व भाग 4 मार्चपासून OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केले जातील."

अजय ACP रुद्राच्या भूमिकेत दिसणार आहे
सहा भागांच्या या सीरिज अजय देवगण 'ACP रुद्र वीर सिंग'ची भूमिका साकारत आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये अजय देवगण जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये राशी खन्ना सअजय देवगणसोबत माइंड गेम्स खेळताना दिसत आहे. तसेच अजय एका क्रिमिनलच्या शोधात आहे.

या गुन्हेगाराच्या शोधात अजयला अनेक गोष्टी पाहायला मिळत असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणीही वाढत आहेत. ही सीरिज गूढतेने भरलेली एक जबरदस्त क्राईम ड्रामा असणार आहे हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

'रुद्र' हा 'लुथर'चा हिंदी रिमेक आहे
राजेश मापुस्कर दिग्दर्शित या क्राइम थ्रिलर वेब सीरिजमध्ये अजय-राशी व्यतिरिक्त ईशा देओल, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर आणि आशिष विद्यार्थी हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजमधून अजय ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहे. 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' हा हॉलिवूड स्टार इद्रिस एल्बाची यशस्वी ब्रिटीश वेब सीरिज 'लुथर'चा हिंदी रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...