आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण रविवारी (5 फेब्रुवारी) स्पॉट झाली. यादरम्यान न्यासासोबत तिची बेस्ट फ्रेंड आणि अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपाल आणि ओरीही दिसल्या. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये न्यासा पापाराझींना हाय म्हणताना दिसत आहे.
लाल ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली न्यासा
यावेळी न्यासाने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर माहिका ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. न्यासाचा हा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. जिथे एकाने लिहिले की, 'न्यासा खूपच सुंदर दिसत आहे.' दुसर्याने लिहिले, 'ती नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे. त्याचवेळी काहींनी तिला अभिनय क्षेत्रात लवकर प्रवेश करावा, अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले.
वेदांत महाजनला डेट करत आहे न्यासा
अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणचे नाव बॉयफ्रेंड वेदांत महाजनसोबत अनेक दिवसांपासून जोडले जात आहे. रिलेशनशिपच्या बातम्यांमध्ये वेदांत अनेकदा न्यासासोबत स्पॉट झाला आहे. वेदांतबद्दल सांगायचे तर तो एक बिझनेसमॅन असून लंडनमध्ये राहतो.
न्यासाचा चित्रपटांमध्ये येण्याचा कोणताही विचार नाही
न्यासा सध्या स्वित्झर्लंडमधून इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी ती सिंगापूरमध्ये शिकत होती. न्यासाला प्रसिद्धीझोतात राहणे आवडत नाही. न्यासाचे सोशल मीडिया अकाउंटदेखील खाजगी आहे आणि ती तेथे निवडक लोकांनाच फॉलो करते. काही दिवसांपूर्वी, काजोलला तिच्या मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारण्यात आले होते, ज्यावर तिने सांगितले की सध्या तिच्या मुलीचे संपूर्ण लक्ष अभ्यासावर आहे. चित्रपटात येण्याचा तिचा कोणताही विचार नाही. यासोबतच काजोलने असेही म्हटले होते की, जर न्यासा चित्रपटात आली तर तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.