आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजय देवगण हा बॉलिवूडमधील अशा काही निवडक अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना महागड्या गाड्यांची आवड आहे. रिपोर्ट्सनुसार, आता अजयने मर्सिडीज मे-बॅक DGLS600 ही आलिशान गाडी खरेदी केली असून त्याची किंमत सुमारे 3 कोटी आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे यात 3982 सीसीचे इंजिन आहे.
पाच सीटर कारला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट्स आणि 12.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. त्याची चाके मिश्र धातुपासून बनलेली आहेत, या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि फ्लेक्झिबल स्टियरिंग देखील आहे.
अनेक लग्झरी गाड्यांचा मालक आहे अजय
अजय देवगणकडे आधीपासूनच Rolls-Royce Cullinan ही लग्झरी आहे. जगातील सर्वात महागड्या SUV मध्ये या कारची गणना होते. या आलिशान गाडीची किंमत जवळपास 6.95 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर ऑडीसह इतर 6 गाड्या आहेत.
एक नजर टाकुया अजय देवगणच्या गाड्यांच्या कलेक्शनवर...
रोल्स रॉयस
ऑडी A5
बीएमडब्ल्यू X7
BMW 7 Series
ऑडी Q7
रेंज रोव्हर
'भोला'मध्ये दिसणार आहे अजय देवगण
अजय देवगणचा अलीकडेच आलेला 'दृश्यम 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 343.42 कोटींची कमाई केली आहे. केवळ 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची कमाई पाहून समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
'तान्हाजी'नंतर अजयचा हा दुसरा सर्वात हिट चित्रपट आहे. अजय आता भोला या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी 3D मध्ये रिलीज होणार आहे. हा साऊथचा सुपरहिट चित्रपट 'कैथी'चा रिमेक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.