आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या:सैफच्या 'उज्मा’ आणि ‘होमी भाभा’ बायोपिकसह 'चाणक्य’चे चित्रीकरणही लांबणीवर, या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार होते चित्रपटावर काम सुरू

अमित कर्ण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्री-प्रॉड्क्शनवर लक्ष देत आहेत निर्माते

रिलायन्स एंटरटेनमेंटच्या भारत-पाक प्रॉक्सी वॉरच्या चित्रपटानंतर इंडस्ट्रीच्या आणखी मोठ्या तीन चित्रपटाचे शूटिंगदेखील पुढच्या वर्षांपर्यंत लांबणीवर गेले आहे. यात सैफ अली खानच्या दोन आणि अजय देवगणच्या एका चित्रपटाचा समावेश आहे. सैफ अली खानचा 'उज्मा' बायोपिक आणि शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभावरील चित्रपट यावर्षी यांच्या निर्मितीची काही शक्यता नाही. दुसरीकडे अजय देवगणचा ‘चाणक्य’देखील पुढच्या वर्षीच सुरू होऊ शकेल. ट्रेड तज्ज्ञ आणि त्यांच्या जवळच्या मित्रांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याआधी ‘उज्मा’चे शूटिंग या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर आणि अजय देवगणच्या ‘चाणक्य’चे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होते.

नुसरतने साइन केला नाही 'उज्मा’

‘उज्मा’चे निर्माते वर्देच्या टीमने सांगितले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्व काही विस्कळीत झाले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्क्रिप्ट नॅरेशन, रीडिंग, सायनिंगचे काम सर्व अचानक थांबले आहे. ‘उज्मा’च्या पेपरवर्कचे काम सैफ अली खान पूर्ण केले आहे. नुसरत भरुचाही हा सिनेमा साइन करणार होती मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्व काम अचानक थांबले आहे.

प्री-प्रॉड्क्शनवर लक्ष देत आहेत निर्माते

दुसरीकडे ट्रेड तज्ज्ञांनी सांगितले, सैफप्रमाणेच अजयच्या ‘चाणक्य’चे काम ही रखडले आहे. पुढच्या तीन ते चार महिने शूटिंग सुरू होईल की नाही, याची कुणालाच खात्री नाही, अशी आताची परिस्थिती झाली आहे. सर्व निर्माते विचारपूर्वक काम करत आहेत. काही जण सध्या प्री-प्रॉडक्शवर लक्ष देत आहेत. शूटिंग करण्यास घाबरत आहेत.

6 वर्षे केले ‘चाणक्य’वर रिसर्च, नंतर अजयला विचारणा
अजयच्या 'चाणक्य’शी जोडलेल्या लोकांनी दिव्य मराठीला सांगितले, या चित्रपटासाठी निर्मात्यांनी खूप संशोधन केले आहे. टीमने चाणक्यवर डझनभर पुस्तक वाचली आहेत. ते यावर 6 वर्षापासून संशोधन करत आहेत. याबरोबरच त्यांनी पूर्ण भारतात फिरून चाणक्यविषयी माहिती गोळा केली. दरम्यान त्यांनी पटना, जबलपुर, इंदुर आणि काशीमधील ग्रंथालयातून माहिती मिळवली. इतक्या संशोधनानंतर स्क्रिप्ट अजय देवगणला देण्यात आली. मात्र यावर पुढच्या वर्षीच काम सुरू होऊ शकेल. कारण अजयकडे सध्या मेडे’, ‘थँकगॉड’ आणि ‘रुद्रा’आदी सिनेमे आहेत.

बातम्या आणखी आहेत...