आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय देवगणने बिग बजेट चित्रपटाला म्हटले 'नो':अजयने सोडला YRF चा 180 कोटी बजेटचा चित्रपट, हे आहे त्यामागचे कारण

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुपरव्हिलनची भूमिका साकारणार होता अजय

अभिनेता अजय देवगणने यशराज फिल्म्सच्या बिग बजेट चित्रपटाला नकार दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा एक सुपरहीरोवर आधारित चित्रपट आहे. अजयचे मानधन आणि चित्रपटाचा निर्मिती खर्च असे एकुण मिळून चित्रपटाचे बजेट तब्बल 180 कोटी रुपये होते.

सुपरव्हिलनची भूमिका साकारणार होता अजय

अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या चित्रपट अजयला सुपरव्हिलनच्या भूमिकेत कास्ट करण्यात आले होते. परंतु ताज्या अहवालानुसार, अजय आता या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. शिव रवैल दिग्दर्शित या चित्रपटासाठी यशराजला अजयच्या भरपूर तारखा हव्या होत्या. मात्र अजय सध्या त्याच्या ब-याच प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. त्यामुळे अजयला यशराजला हव्या असेलल्या तारखा देणे शक्य नव्हते. तर यशराजला हा चित्रपट कोणत्याही कारणाने लांबणीवर टाकायचा नाहीये. त्यामुळे अजयने या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ईदला रिलीज होतोय अजयचा 'भूज : द प्राइड ऑफ इंडिया'
अजय देवगण सध्या बॉलिवूडच्या सर्वात बिझी कलाकारांपैकी एक आहे. त्याच्याकडे सध्या मैदान, भूज : द प्राइड ऑफ इंडिया, गंगुबाई काठियावाडी हे चित्रपट आहेत. त्याचा भूज : द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपट येत्या ईदला रिलीज होण्याची शक्यता आहे. अजयसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा नोरा फतेही आणि शरद केळकर यांनीदेखील यात काम केले आहे.

अजय देवगणचे ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’द्वारे डिजिटल विश्वात पदार्पण

अजय देवगण डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. तो लवकरच ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या सीरिजमधील लूक शेअर केला आहे. या सीरिजचे चित्रीकरण लवकरच मुंबईमध्ये केले जाणार आहे. मात्र ही सीरिज केव्हा प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अजयने सोशल मीडिया अकाउंटवर सीरिजमधील फर्स्ट लूक शेअर करत म्हटले, 'मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या क्राइम थ्रिलर सीरिजमधून मी डिजिट विश्वात पदार्पण करत आहे.'

बातम्या आणखी आहेत...