आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भोला'चा टिझर रिलीज:कपाळावर राख आणि हातात श्रीमद् भागवत गीता घेऊन दिसला अजय, 3डीमध्ये येणार चित्रपट

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दृश्यम 2'नंतर अजय देवगण त्याचा बहुप्रतिक्षित 'भोला' हा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा टिझर आज रिलीज झाला आहे. 'भोला' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टिझर जबरदस्त आहे. टिझरच्या सुरुवातीला ज्योती नावाची एक चिमुरडी अनाथाश्रमात दिसते. अनाथाश्रमाची केअरटेकर ज्योतीला सांगते की, तिला कोणीतरी भेटायला येणार आहे. हे ऐकून कोण भेटणार येणार याच्या विचारात ती पडते. यानंतर अजय देवगण तुरुंगात दिसतो. त्याच्या हातात श्रीमद् भागवत गीता आहे. टिझरच्या शेवटी अजय अ‍ॅक्शन करताना दिसतोय. हा चित्रपट धमाकेदार अ‍ॅक्शन चित्रपट असेल हे चित्रपटाच्या टिझरवरून दिसून येतंय.

कधी रिलीज होणार 'भोला'?
'भोला'च्या टिझरनंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र 'भोला'च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातोय की, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात अजयशिवाय तब्बूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच अजय देवगणने दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे.

'भोला' हा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे

अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट तामिळ चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार कार्थी शिवकुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले होते. 2019 मध्ये आलेल्या या क्राईम थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...