आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या नवीन चित्रपटाची घोषणा:'गोबर'साठी सिद्धार्थ रॉय कपूरसोबत अजयची हातमिळवणी, नायकाचा शोध सुरू; 90 च्या दशकातील सत्यघटनेवर आधारित असेल कथानक

अमित कर्ण9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या नायकाचा शोध घेतला जात आहे.

कोरोनाच्या संचारबंदीमुळे चित्रपटांचे चित्रीकरण थांबले असले तरी नव्या चित्रपटांच्या घोषणा होत आहेत. आता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अजय देवगण एका चित्रपटासाठी एकत्र आल्याची माहिती दिव्य मराठीला मिळाली आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे नाव ‘गोबर’आहे. त्याचे दिग्दर्शन जाहिरातपटाचे दिग्दर्शक सबल शेखावत करतील. सबल यांनी संभित मिश्रा यांच्यासोबत त्याचे लेखन केले आहे. अजय या चित्रपटात स्वत: नसणार, तो फक्त सिद्धार्थसोबत निर्माता असेल. वर्षअखेरीस चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. सध्या नायकाचा शोध घेतला जात आहे.

चित्रपटाबाबत अजय देवगण म्हणतो, ‘गोबर’ ची कथा खूपच वेगळी, अद्भुत आणि मनोरंजक आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करेल असा मला विश्वास आहे. आम्हाला जसा हवा आहे तसाच प्रभाव चित्रपटाचा असेल असाही विश्वास आहे. प्रेक्षकांनी हसावे आणि समाजातील वास्तव बघून त्याबाबत थोडा विचार करावा, अशी आमची इच्छा आहे.

प्राण्यांच्या डॉक्टरची कथा
चित्रपटाशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाची कथा 90 च्या दशकातील आहे. सत्यघटनांवर आधारित हा चित्रपट विनाेदाच्या माध्यमातून समाजाच्या त्रुटी दाखवेल. ही एका पशुवैद्यकाची कथा आहे. त्याला बेवारस प्राण्यांबाबत प्रेम आहे. त्याला प्राण्यांसाठी काहीतरी करायचे आहे. मात्र, त्याच्या मार्गात स्थानिक रुग्णालय प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आडवे येतात. यामुळे तो प्राण्यांना त्यांचे हक्क मिळवून देतो का? चित्रपटात ते दाखवण्यात येणार आहे.

अजयची निवड चांगली आहे - सिद्धार्थ रॉय कपूर
चित्रपटाविषयी निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर म्हणतात, 'ही सामान्य माणसाच्या शौर्याची कथा आहे. तो हसत-खेळत भ्रष्टाचाराचा सामना करतो आणि सर्वसामान्य माणूस शक्तिशाली असल्याचा संदेश देतो. त्यात परिस्थितीवर आधारित हास्य असून जगातील भ्रष्टाचाराचा खुलासा करते. अजय देवगणच्या या क्लासिक निवडीचा मी सन्मान करतो. त्यांची टीम या चित्रपटात जीव ओतेल, असा मला विश्वास आहे.'

एकाच वेळी एवढ्या प्रकल्पांत व्यग्र आहे अजय

  • ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चे पोस्ट प्रॉड्क्शन सुरू आहे.
  • ‘मे-डे’चे चित्रीकरण कतार व दोहात करण्याच्या पर्यायांवर विचार सुरू आहे.
  • 'मैदान’बाबत सध्याच्या स्थितीत निर्माते काय करू शकतात, यावर झूम कॉलवर बैठका सुरू आहेत.
  • ‘थँक गॉड’चे चित्रीकरण सुरू आहे. निर्माते दीपक मुकुट यांना कोरोना झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...