आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट:'OMG'मधील श्रीकृष्णाप्रमाणे 'थँक गॉड'मध्ये मॉर्डन यमराजच्या भूमिकेत दिसणार अजय देवगण, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविडमुळे चित्रपटाच्या शूटिंगला एक वर्ष उशीर झाला

अभिनेता अजय देवगणच्या बॅनरच्या 'थँक गॉड' या चित्रपटाच्या शूटिंगला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. याचे दिग्दर्शन इंद्रकुमार करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजय या चित्रपटात यमराजच्या भूमिकेत दिसणार आहे. पण चित्रपटात अजय रेड्यावर स्वार झालेला दिसणार नाहीये. 'ओह माय गॉड' (ओएमजी) मध्ये अक्षय कुमारने साकारलेल्या मॉर्डन श्रीकृष्णाप्रमाणे अजयचे चित्रपटातील पात्र असेल . थँक गॉडमध्ये यमराजच्या व्यक्तिरेखेला तोच आधुनिक लूक देण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माता दीपक मुकुट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपण प्रत्येक परिस्थितीत 'थँक गॉड' म्हणायला हवे
दीपक मुकुट यांचा वर्षातील हा दुसरा चित्रपट आहे, ज्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी त्यांच्या 'धाकड' या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. सोहेल मकलई हे या चित्रपटाचे सह-निर्माता आहेत. दुसरीकडे, 'थँक गॉड'मध्ये भूषण कुमार यांच्यासह 4-5 निर्माते आहेत. दीपक म्हणाले, "जेव्हा माणसासोबत काही चांगले घडते तेव्हा थँक गॉड चांगले झाले, असे आपण म्हणतो. जेव्हा काही वाईट घडते तेव्हाही आपल्याला देवाची आठवण होते. आपण प्रत्येक परिस्थितीत 'थँक गॉड' म्हणायला हवे, हे या चित्रपटात दाखवले जाणार आहे," असे दीपिक यांनी सांगितले.

कोविडमुळे चित्रपटाच्या शूटिंगला एक वर्ष उशीर झाला
दीपक म्हणाले, अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे या चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत. गेल्या वर्षी कोविडपूर्वीच चित्रीकरण सुरु होणार होते, आतापर्यंत तर चित्रपट रिलीजसाठी सज्ज असता. दुर्दैवाने चित्रीकरण हे एक वर्षानंतर सुरू झाले आहे. ठरलेल्या बजेटमध्येच चित्रपट तयार होईल. आतापर्यंत एक कोटींहून अधिक खर्च कोविडपासून बचाव करण्यासाठी विमा वगैरेवर करण्यात आला आहे," अशी माहितीही दीपिक यांनी दिली.

दीपक चित्रपटाच्या शूटिंगबद्दल म्हणाले, "चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली येथे होणार होते, परंतु आता संपूर्ण सेटअप मुंबईतच हलवण्यात आला आहे. संपूर्ण चित्रपटात यमराज आणि मनुष्यातील झालेला संवाद आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूनंतर वर जाते, तेव्हा तिथे त्याला कोणकोणता हिशेब द्यावा लागतो, यावरच हा चित्रपट आहे."

अजय देवगणचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
अजय देवगणच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, "अजयकडे बरेच प्रोजेक्ट्स लाइनअप आहेत. सध्या 'मेडे'च्या चित्रीकरण अजून काही दिवस बाकी आहेत. 'मैदान'चे 15 ते 20 दिवसांचे काम शिल्लक आहे. त्यानंतर तो 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'च्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम करेल. यानंतर अजय यावर्षी दसरा किंवा दिवाळीपर्यंत ‘चाणक्य’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'चाणक्य'च्या अगोदर अजयला आपल्या उर्वरित चित्रपटांचे शुटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन पूर्ण करायचे आहे जेणेकरुन त्याला 'चाणक्य'च्या गेटअपसाठी तयार होता येईल. या चित्रपटासाठी प्रोस्थेटिकऐवजी जर त्याला टक्कल करावे लागले, तर इतर चित्रपटांवर त्याचा परिणाम होणार नाही."

बातम्या आणखी आहेत...