आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार जोडी करणार कमबॅक:मेजर साबनंतर अमिताभ बच्चन यांना पुन्हा डायरेक्ट करणार अजय देवगण, डिसेंबरपासून हैदराबादमध्ये सुरू होणार मईडेची शूटिंग

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय आणि अमिताभ यांना यापुर्वी मेजर साब, खाकी आणि सत्याग्रहमध्ये एकत्र दिसले आहेत.

अजय देवगणने गेल्यावेळी बिग बींसोबत 7 वर्षांपूर्वी प्रकाश झा यांचा चित्रपट सत्याग्रहमध्ये काम केले होते. आता अजय डायरेक्टर म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत मईडे या चित्रपटात दिसणार आहेत. एवढेच नाही तर अजय या चित्रपटामध्ये पायलटच्या भूमिकेत असणार आहे. फिल्मची शूटिंग हैदराबादमध्ये डिसेंबरमध्ये सुरू होईल. अजय आणि अमिताभ यांना यापुर्वी मेजर साब, खाकी आणि सत्याग्रहमध्ये एकत्र काम करताना पाहिले आहे. या दोन्ही दिग्गजांच्या जोडीचा हा चौथा चित्रपट आहे.

शिवायनंतर अजयचा दुसरा चित्रपट
मईडेपूर्वी अजय देवगणने शिवायचे डायरेक्शन केले आहे. फिल्म बॉक्स ऑफिसवर एव्हरेज चालली. तर अजय सध्या आपला चित्रपट भुजःद प्राइड ऑफ इंडियाची शूटिंग करत आहे. भुजमध्येही अजय इंडियन एअरफोर्सच्या पायलटच्या रुपात दिसेल. तर बिग बी हे सध्या ते कोण बनेगा करोडपती 12 ची शूटिंग करत आहेत.

मेजर साबचे काही सीन केले होते डायरेक्ट
यापुर्वी अजयने अमिताभ यांच्या प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या फिल्म मेजर साबचे काही सीन डायरेक्ट केले होते. दरम्यान त्या वेळी दिग्दर्शक टीनू आनंदसोबत अमिताभ यांचे काही गोष्टींवरुन वाद झाला होता तेव्हा ते टीनू चित्रपट सोडून गेले होते. बिग बींसाठी हा चित्रपट महत्त्वाचा होता. कमी बजेटमध्ये चित्रपट पूर्ण करायचा होता. दरम्यान अजयने डायरेक्शनची इच्छा अमिताभ यांच्यासमोर ठेवली. यानंतर आपल्या मित्रांच्या मदतीने अजयने उर्वरित शूटिंग पूर्ण केली होती.

बातम्या आणखी आहेत...