आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म शेड्यूल:रशियात 19 ऑक्टोबरपासून अजय देवगण सुरु करणार 'मे-डे’चे चित्रीकरण, गुरुवारीच मालदीवहून परतला; आलिया भट्टचा साँग सिक्वेन्सही रशियात होणार शूट

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात बॉलिवूडचे आवडते लोकेशन बनले रशिया

या कोरोना काळात रशियामध्ये सर्वात जास्त शूटिंग केले जात आहे. बॉलिवूडने रशियाला पहिली पसंती दिली आहे. तेथील लोकेशन बऱ्याच निर्मात्यांना आवडली आहे. काही दिवसांपूर्वीच तेथे सलमान खान आणि कतरिना कैफने 'टायगर ३’चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता पुढच्या महिन्यात अजय देवगणदेखील तेथे 'मे-डे’ चित्रपटाचे शूटिंग करणार असल्याचे ऐकले आहे. याशिवाय करण जोहरदेखील आपल्या बॅनर खाली धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तेथे दोन चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग करण्याची तयारी करत आहे. सध्या साऊथचा स्टार अजित रशियात चित्रपट ‘वालिमय’चे शूटिंग करत आहे.

आधी दोहामध्ये शूट होणार होते
अजय गुरुवारी बेअर ग्रिल्सच्या शोचे शूटिंग पूर्ण करुन मालदीववरुन भारतात परतला आहे. आता तो 19 ऑक्टोबरपासून रशियामध्ये 'मे-डे’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. त्याच्या टीमने नुकतेच रशियामध्ये लोकेशनसाठी रेकी केली होती. तो तेथे मास्को विमानतळावर चित्रपटाचे शूटिंग करू शकतो. आधी तो हे दृश्य दोहामध्ये शूट करणार होता. मात्र कोरोनामुळे तेथे शूटिंगची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे टीमने मास्कोमध्येच दोहा विमानतळ रीक्रिएट करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे विमान अपघाताचे दृश्य शूट केले जाणार आहे. या चित्रपटात अजय पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. रशियामध्ये चित्रपटाचे लास्ट शेड्यूल शूट केले जाणार आहे. ते 7 ते 10 दिवसाचे असेल, त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल.

रशियाचा खर्च मुंबईसारखाच
याव्यतिरिक्त रशियाच्या सांस्कृतिक विभागाने ओटीटी प्लॅटफाॅर्म डिस्ने प्लस हाॅटस्टारसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत 16 ऑक्टोबरपासून हॉटस्टारवर रशियन सिने महोत्सवाचे आयोजन होईल. विविध प्रॉडक्शन हाऊसच्या एक्झिक्युटिव्ह निर्मात्यांनी रशिया इतर युरोपीय देशांपैकी स्वस्त असल्याचे सांगितले. तेथे 7 स्टार हाॅटेलमध्ये थांबण्याचा खर्च मंंुबईसारखाच आहे. लेक बायकलसारख्या लोकेशनवर शूटिंगसाठी पैसे लागत नाहीत.

गाण्याच्या शूटिंगमध्ये आलिया, वरुण व किआरा
अजयव्यतिरिक्त ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करण जोहरची टीमदेखील शूटिंगसाठी रशियाला जाणार आहे. ते तेथे आलिया आणि रणबीर यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील गाणे चित्रित करणार आहेत. याचे शेड्यूल 5 ते 6 दिवसांचे राहणार आहे. याव्यतिरिक्त वरुण धवन आणि किआरा आडवाणी यांच्या ‘जुग जुग जियो’चे गाणेदेखील रशियामध्येच चित्रित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट धर्मा बॅनरखाली बनत आहेत.

कुटुंबासोबत सुटीवर जाणार अजय
मालदीवला जाण्याआधी अजय वेब शो ‘रुद्रा’, ‘मैदान’चे शूटिंग करत होता. त्याचे शूटिंग अजून बाकी आहे. अजय मालदीववरुन परतला मात्र तो लगेच ‘रुद्रा’वर काम करणार नाही. तो सध्या काही दिवसाची सुटी घेऊन कुटुंबासोबत फिरायला जाणार आहे. तेथुन परत आल्यावर ‘रूद्रा’ आणि ‘मैदान’चे काम पूर्ण करणार. नंतर ऑक्टोबरपासून 'मे-डे’वर काम करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...