आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:अजय देवगणने काजोलला दिल्या शुभेच्छा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला- काजोल अजूनही माझ्यासोबत आहे याचे आश्चर्य वाटते

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय देवगणने सोशल मीडियावर काजोलसोबतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे.

अजय देवगण आणि काजोल त्यांच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानली जाते. बॉलिवूडचे हे बेस्ट कपल 24 फेब्रुवारी 1999 रोजी विवाहबद्द झाले होते. यानिमित्ताने अजयने सोशल मीडियावर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत काजोलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - प्रेम हे नेहमीच आहे.

अजयने हा व्हिडिओ शेअर केला
अजय देवगणने सोशल मीडियावर काजोलसोबतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काजोलला पाहून अजय म्हणतो, काजोल अजूनही माझ्यासोबत आहे याचे मला आश्चर्य वाटते. त्याचवेळी, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अजयने लिहिले, 1999 - प्यार तो होना ही था, 2002 प्यार तो ऑलवेज है!.

कसे जवळ आले काजोल-अजय

दोघांची भेट 'हलचल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. आधी मैत्री झाली. परंतु अजयला पहिल्यांदा भेटल्यानंतर काजोलच्या लक्षात आले, की अजयला समुद्र किना-यावर एकटे बसायला आवडते. तो फारसा कुणाशी बोलत नव्हता. मुळात अजयचा स्वभावच अबोल असा होता. त्यावेळी काजोलला वाटायचे की, एखाद्या व्यक्तीला कुणाशी बोलायला आवडत नाही, असे कसे होऊ शकते. कालांतराने अजय हळू-हळू काजोलसोबत बोलायला लागला आणि त्यांची मैत्री झाली.

त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' हे त्यांनी एकत्र केलेले चित्रपट आहेत. हळू-हळू अजय आणि काजोल यांच्यात जवळीक वाढली आणि 1999 मध्ये दोघांनी लग्न केले. हे लग्न अजय देवगणच्या घरी महाराष्ट्रीयन पध्दतीने झाले होते.

बातम्या आणखी आहेत...