आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनसाइड डिटेल्स:‘भुज...’ च्या अ‍ॅक्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे अजय, 95 पेक्षा अधिक व्हीएफएक्सचा वापर; ईदला करणार मोठा धमाका

अमित कर्ण17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनवायई स्टुडिओत सुरू आहे काम

अजय देवगणचा चित्रपट ‘भुज : प्राइड ऑफ इंडिया’ प्रदर्शित होण्यास उशीर होत आहे. या चित्रपटाशी संबंधितांनी या नवनिर्मितीबाबत दैनिक दिव्य मराठीला माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट आयपीएलच्या दरम्यानच ओटीटी प्लॅटफाॅर्म हाॅटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार होता. यासाठी हाॅटस्टारने अजयसोबत एक जाहिरातदेखील बनवली होती. ही जाहिरात आयपीएलदरम्यान प्रसारित होत आहे. परंतु, चित्रपट ‘भुज’चे चित्रीकरण आतापर्यंत पूर्ण झाले नाही. यातच आता हाॅटस्टार या चित्रपटास ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे.

ईदच्या दिवशी निर्माते प्रेक्षकांना मोठा चित्रपट देतील
‘भुज..’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित करण्यात येणार आहे. कारण आता ईदच्या मुहूर्तावर ‘राधे..’ किंवा ‘सत्यमेव जयते 2’ हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच निर्माते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठा चित्रपट देण्याची शक्यता आहे. ओटीटी प्लॅटफाॅर्म हाॅटस्टारचेदेखील हेच म्हणणे आहे की, सलमानचा चित्रपट ईदच्या दिवशीची संधी सोडत असेल तर अजय, संजय दत्त आणि सोनाक्षीसारख्या मोठ्या कलाकारांचा चित्रपट लोकांचे चांगले मनोरंजन करेल. या चित्रपटात नोरा फतेही आणि शरद केळकर यांनीदेखील यात काम केले आहे.

एनवायई स्टुडिओमध्ये निर्मितीचे सुरू आहे काम
चित्रपटाच्या निर्मितीचे काम एनवायई (न्यासा युग) स्टुडिओमध्ये सुरू आहे. अजय या चित्रपटाच्या क्वालिटीबाबत कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही, त्यामुळे याच्या निर्मितीसाठी खूप वेळ लागत आहे. चित्रपटाची एडिटिंगदेखील पूर्ण झालेली आहे. युद्धाच्या सीनमध्येही व्हीएफएक्सवर खूप मेहनत घेणे बाकी आहे. या चित्रपटात 95 पेक्षा अधिक व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.

20 कोटींच्या चित्रीकरणावर 35 कोटींचा व्हीएफएक्स
चित्रपटाचा 70 टक्के भाग अ‍ॅक्शनने भरलेला आहे. या क्षणांना कोरिओग्राफ करण्यासाठी ‘बाहुबली’ फेम अ‍ॅक्शन डायरेक्टर पीटर हेन्स यांची मदत घेतली आहे. युद्धाचे क्षण चित्रित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची किंमतच 10 कोटींच्या आसपास आहे. या चित्रपटात खरेखुरे टँक वापरण्यात आलेले आहेत. त्यांना उडवण्यासाठी प्रोटोटाइपचे टँकदेखील बनविण्यात आले आहे. त्यांची किंमत 10-15 लाख रुपये आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शनच्या क्षण चित्रित करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता 35 कोटींच्या खर्चात व्हीएफएक्सवर काम होत आहे.

अजय देवगणचे ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’द्वारे डिजिटल विश्वात पदार्पण

अजय देवगण डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. तो लवकरच ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या सीरिजमधील लूक शेअर केला आहे. या सीरिजचे चित्रीकरण लवकरच मुंबईमध्ये केले जाणार आहे. मात्र ही सीरिज केव्हा प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अजयने सोशल मीडिया अकाउंटवर सीरिजमधील फर्स्ट लूक शेअर करत म्हटले, 'मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या क्राइम थ्रिलर सीरिजमधून मी डिजिट विश्वात पदार्पण करत आहे.'

बातम्या आणखी आहेत...