आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:अजय देवगणच्या वाढदिवशी येणार ‘आरआरआर’ मधील त्याचा फर्स्ट लूक, विकी-किआराने सुरू केली ‘मिस्टर लेले’ची शूटिंग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

एस. एस. राजामौलींच्या 'आरआरआर' चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक पोस्टर 2 एप्रिल रोजी, त्याच्या 52 व्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. अजयने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावर त्याने लिहिले आहे, आरआरआरचा भाग होण्यात खूप मजा आली. राजामौलीने माझ्या व्यक्तिरेखेची रचना कशी केली हे दाखवण्यासाठी मी थांबू शकत नाही.' खरं तर, हा अजयचा पहिला तेलगू चित्रपट आहे. यात दक्षिणेचा सुपरस्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि श्रेया सरन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा 1920 च्या क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमारम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

  • मितालीनंतर आता सानिया मिर्झादेखील बनू शकते तापसी

तापसी पन्नू दिग्गज खेळाडुंच्या बायोपिक बनवण्यात व्यग्र आहे. सध्या ती पूर्व क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक पूर्ण करण्यात लागली आहे. त्याचे शीर्षक ‘शाबाश मितु’ आहे. यापूर्वी ती ‘रश्मी रॉकेट’मध्ये एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. याचे शूटिंग तिने आधीच पूर्ण केले आहे. आता ती आणखी एक स्पोर्ट्स बायोपिक साइन करणार असल्याची चर्चा आहे. तिला सानिया मिर्झा यांच्या बायोपिकसाठी विचारणा झाली आहे. यावर लवकरच घोषणा होऊ शकते. रॉनी स्क्रूवालाने चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत. निर्माते तापसी या भूमिकेसाठी योग्य मानतात. तर तापसीलादेखील स्क्रिप्ट आवडली आहे. तापसीची टीम इतर औपचारिकतेवर काम करत आहे. सध्या तरी काहीच ठरले नाही. तापसीने हा चित्रपट साइन केला तर तिला आणखी एका खेळाची माहिती होईल.

  • ‘हेलन’च्या रिमेकसाठी प्रचंड मेहनत घेतेय जान्हवी कपूर

‘रुही अफ्जा’नंतर जान्हवी कपूर लवकरच मल्याळम सिनेमा ‘हेलन’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट आहे, ज्यामध्ये जान्हवी एका मध्यमवर्गीय श्रमिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जी चुकून सुपर मार्केटच्या फ्रीजरमध्ये बंद होते. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर करत आहेत. बोनी यांनी जान्हवीला सांगितले आहे की, ती ही भूमिका करताना जर थोडीही फेक दिसली तर प्रेक्षक हा चित्रपट नाकारतील. त्यामुळे तिला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. सूत्रानुसार, ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी जान्हवी खरचं एकदा तसा प्रयोग करुन पाहणार आहे. ती शून्य डिग्रीपेक्षा कमी तापमानात स्वत:ला आयसोलेट करणार आहे, जेणेकरुन तिचे पात्र प्रेक्षकांना खरे वाटावे. खरंतर, जान्हवी सध्या तिच्या दोन बहिणी अंशुला आणि खुशीसोबत सुटी साजरी करत आहे. या ब्रेकनंतर ती हेलनच्या हिंदी रिमेकवर काम सुरू करणार आहे. याशिवाय जान्हवीचे बरेच मोठे प्रोजेक्ट आहेत आणि तिचा पुढचा चित्रपट ‘गुड लक जेरी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.

  • विकी आणि किआराने मुंबईत सुरू केली ‘मिस्टर लेले’ची शूटिंग

दिग्दर्शक शशांक खेतानच्या ‘मिस्टर लेले’ चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. वरुणने चित्रपट सोडल्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट लांबणीवर टाकला होता मात्र आता विकी आणि किआरा आडवणी यांच्यासोबत मुंबईतच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरदेखील मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा आहे. विकी यात महाराष्ट्राच्या एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे किआराच्या पात्राविषयी अजून काहीच माहिती समोर आली नाही. विकी आणि किआरा दुसऱ्यांदा सोबत काम करत आहेत. यापूर्वी दोघांनी ‘लस्ट स्टोरीज’मध्ये एकत्र काम केले होते. याशिवाय विकी ‘सरदार उधम सिंह’, ‘अश्वतथामा’ आणि ‘सैम मानेकशॉ’मध्येही दिसणार आहेत. किआरादेखील जुग जुग जियो’मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...