आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही सीरिज ‘लूथर’चा रिमेक:डिजिटलकडे वळला अजय, जुलैपासून मुंबईत सुरू करणार ‘रुद्र...’चे चित्रीकरण, लाइव्ह लोकेशन्सवर होणार आऊटडोर शूट

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौथ्यांदा अजयसोबत दिसणार इलियाना

सिने इंडस्ट्रीचे काम पुन्हा रूळावर येताना दिसत आहे. अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’नंतर आता अजय देवगणदेखील आपल्या डिजिटल प्रोजेक्ट ‘रुद्र : द अ‍ॅज ऑफ डार्कनेस’चे शूटिंग जुलैपासून सुरू करणार आहे. याचे शूटिंग 10 एप्रिलपासून सुरू हाेणाार हाेते, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे याचे काम रखडले आहे. आता याचे शूटिंग जुलैपासून सुरू होणार आहे. दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनीदेखील बातमीला दुजाराे दिला आहे. 'रुद्र’ बीबीसीची टीव्ही सिरीज 'लूथर’वर आधारित आहे. त्यात एक डिटेक्टिव्ह असतो तो पूर्ण शहरात फिरतो आणि एका सिरियल किलरला शोधून काढतो.

  • लाइव्ह लोकेशन्सवर होणार आऊटडोर शूट

‘रुद्र’चे संपूर्ण शूटिंग मुंबईत केले जाणार आहे. या शोमध्ये अजयदेखील शहरात सिरियल किलरला शोधताना दिसणार आहे. यात प्रत्येक शहराचे लँडमार्क ठिकाण दाखवले जाईल. त्यामुळे या शोचे शूटिंग मुंबईच्या लाइव्ह लोकेशनवर होईल. शूटिंग 60 दिवसाच्या स्टार्ट टू फिनिश शेड्यूलमध्ये पूर्ण केले जाईल.

  • चौथ्यांदा अजयसोबत दिसणार इलियाना

दुसरीकडे प्रॉक्डशन हाऊसच्या अधिकृत सूत्रानुसार, यात अजय सोबत इलियाना डिक्रूजला घेण्यात आले आहे. मात्र अजून तिच्या नावाची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. मात्र क्रेडिट लिस्टमध्ये तिच्या नावाचा समावेश आहे. सर्व काही सुरळीत राहिले तर दोघे चौथ्यांदा सोबत काम करतील. यापूर्वी इलियाना आणि अजय 'बादशाहो' आणि 'रेड’मध्ये सोबत दिसले आहेत. तर अजयच्या बॅनर खाली बनलेल्या 'द बिग बुल’मध्येही इलियानाने काम केले आहे. हा शो ‘फरारी की सवारी’ फेम डायरेक्टर राजेश मापुसकर दिग्दर्शित करतील.

  • कोरोनामुळे रखडले अजयचे अनेक प्रकल्प

खरं तर कोविडमुळे अजय देवगणचे वेगवेगळे प्रकल्प अडकले आहेत. त्यांच्यात ‘मेडे’ चित्रपटाचे पुढील वेळापत्रक एप्रिलमध्ये सुरू होणार होते. यानंतर अजय ‘रुद्र’च्या शूटिंगला सुरुवात करणार होता. पण दोन्ही सुरू होऊ शकले नाहीत. याशिवाय त्याच्या ‘मैदान’ आणि ‘चाणक्य’ या चित्रपटाचे कामही बंद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...