आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूट स्टार्ट:अमिताभ, अजय आणि रकुल स्टारर 'मेडे' चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरुवात, 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय पहिल्यांदा अमिताभ यांना डायरेक्ट करणार

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे 11 डिसेंबर पासून अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह स्टारर 'मेडे' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ही माहिती अजय देवगणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन दिली. अजयनेही या पोस्टसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. अजयचे प्रॉडक्शन हाऊस 'अजय देवगन एफ फिल्म' या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

अजयने पोस्ट शेअर करत लिहिले, "मेडेच्या अधिकृत स्टार्ट-टू-फिनिश शूटिंग शेड्यूलची सुरुवात झाल्याने मी खूप खूश आहे. माझे सर्व चाहते, कुटुंब आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पूर्ण होऊ शकत नाही. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होईल."

अजय पहिल्यांदा अमिताभ यांना डायरेक्ट करणार

'सत्याग्रह', 'खाकी' आणि 'मेजर साहब' यासारख्या चित्रपटांमध्ये बिग बींबरोबर काम करणारा अजय पहिल्यांदा 'मेडे' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट करणार आहे. या दोन दिग्गजांच्या जोडीचा हा चौथा चित्रपट आहे. अजयने शेवटचे 7 वर्षांपूर्वी प्रकाश झांच्या 'सत्याग्रह' या चित्रपटात बिग बींबरोबर काम केले होते. 'मेडे' चित्रपटात अजय पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर 'दे दे प्यार दे' या चित्रपटातील त्याची सहकलाकार रकुल त्याच्यासोबत सह-पायलट म्हणून दिसणार आहे.

चित्रपटाची संपूर्ण टीम हैदराबादमध्ये बायो-बबलमध्ये राहणार
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी बायो बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या एका सूत्राने सांगितले होते की, "चित्रपटाचे शूटिंग जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. रकुल लवकरच शूटसाठी टीममध्ये सामील होईल. संपूर्ण टीम हैदराबादमध्ये बायोबबलमध्ये राहणार आहे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser