आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजपूर्वी अजय देवगणने काढली 'भोला यात्रा':वेगळ्या अंदाजात चित्रपटाचे प्रमोशन, 9 शहरे कव्हर करणार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्याने 'भोला यात्रा' सुरू केली आहे. अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजय एका ट्रकसमोर उभा राहून झेंडा दाखवताना दिसत आहे. या ट्रकवर चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

9 शहरांची यात्रा
भोलाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी भोला यात्रा सुरू केली. हा ट्रक ठाणे, सुरत, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, गुरुग्राम, दिल्ली, कानपूर आणि लखनऊ या शहरांमध्ये पाठवला जात आहे. विशेष बाब म्हणजे हा ट्रक प्रत्येक शहरात उभा राहणार असून लोकांसाठी आनंददायी संध्याकाळचे आयोजनही केले जाणार आहे.

साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे भोला'
अजय देवगणचा चित्रपट 'भोला' हा साऊथचा हिट चित्रपट कैथीचा हिंदी रिमेक आहे. अजय व्यतिरिक्त या चित्रपटात तब्बू, गजराज राव, दीपक डोबरियाल सारखे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही अजय देवगणने केले आहे. रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर हा सिनेमा 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...