आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेक न्यासा सतत ट्रोल होत असल्याने त्रासला अजय देवगण:म्हणाला - 'जर मी काही बोललो तर परिस्थिती अजूनच बिघडेल'

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगणने अद्याप फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलेले नाही. पण ती सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. बॉलिवूड पार्ट्यांना ती कायम हजेरी लावत असते. पण कधी रंगरुपामुळे, तर कधी बोल्ड कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. 19 वर्षीय न्यासा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता अजय देवगणने लेकीला केल्या जाणाऱ्या ट्रोलबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत त्याला न्यासाच्या सतत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ट्रोलिंगमुळे आपल्याला त्रास होता कामा नये हे तो त्याच्या मुलांना नेहमीच समजावत असतो, असे त्याने सांगितले.

मी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे - अजय
अजय म्हणाला, "मी माझ्या दोन्ही मुलांना नेहमी सांगत असतो की कोणत्याही ऑनलाइन लिहिल्या गेलेल्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यामुळे तुम्हाला कधीही त्रास होता कामा नये. जेवढे तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे फॅन्स असतात त्यापेक्षा अनेक पटीने कमी ट्रोल करणाऱ्यांची संख्या असते. मला समजत नाही की लोकांकडे इतकी नकारात्मकता कुठून येते. आता मी स्वतः त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे आणि हेच मी माझ्या मुलांनाही करायला सांगतो," असे अजयने सांगितले.

...तर परिस्थिती अजूनच बिघडेल
पुढे अजय म्हणाला, "लोक न्यासाला ट्रोल करतात, हे पाहून मला प्रचंड त्रास होतो. माझ्या मुलांकडे नेहमीच सर्वांचे लक्ष लागलेले असते आणि यामुळे मी त्रस्त असतो. मी या गोष्टींना किंवा ऑनलाईन होणाऱ्या ट्रोलिंगला बदलू शकत नाही. अनेकदा आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे काही ते ट्रोलर्स लिहून जातात. पण काय करणार? मी हे बदलू शकत नाही. यावर मी काही उत्तर दिले तर परिस्थिती अजूनच बिघडेल," असे तो म्हणाला.

'भोला'मध्ये दिसणार आहे अजय
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो लवकरच भोला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अजयसह तब्बू मुख्य भूमिकेत आहे. येत्या 30 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...