आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोलाच्या सेटवर स्कुटी चालवणाऱ्या अजयच्या पाठी एकच धुम:व्हिडिओ शेअर करत मानले चाहत्याचे आभार, हेल्मेट घालण्याचा दिला सल्ला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2'हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याचवेळी, तो आता त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच अजय देवगणचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अजयच्या आगामी चित्रपट भोलाच्या सेटवरील आहे. या व्हिडिओमध्ये अजय स्कूटी चालवताना दिसत आहे. तर असंख्य चाहते त्याच्या मागे पळत आहेत. हा व्हिडीओ शूटिंगच्या वेळीचा आहे. अजयने स्वतः हा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचा सल्लाही दिला.

व्हिडिओ शेअर करताना अजयने लिहिले की, ' अगदी योग्य कारणसाठी जेव्हा गर्दी तुम्हाला फॉलो करत असते. तेव्हा खूप छान वाटते. ड्रायव्हिंग करताना हेल्मेट घालायलाच हवे. शूटिंगमुळे मी हेल्मेट घातले नाही. अजयच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'भोला' या चित्रपटाचा दिग्दर्शकसुद्धा आहे अजय देवगण
अजय देवगणचा भाचा दानिश गांधी त्याला असिस्ट करत असून त्याला पुढे जाऊन दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावायचे आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत अजय देवगणचे तीन चित्रपट लाइनअप आहेत. थँकगॉड, दृष्यम 2 आणि मैदान हे त्याचे चित्रपट असून या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांनुसार, भोलाची तारीख निश्चित केली जाईल. या चित्रपटाचा दिग्दर्शकसुद्धा अजय देवगणच आहे.

तब्बू पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे

मूळ चित्रपट कैथीच्या तुलनेत या रिमेकमध्ये बरेच बदल आहेत. उदाहरणार्थ, मूळ चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका पुरुष अभिनेता नरेनने साकारली होती. त्या पात्रातून नरेनला खूप प्रसिद्धी मिळाली. ती भूमिका भोलामध्ये तब्बूला देण्यात आली आहे. अशा प्रकारे, दृश्यम 2 व्यतिरिक्त, ती पुन्हा एकदा या चित्रपटात एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपक डोबरियालने खलनायकाची भूमिका साकारली आहे. अलीकडच्या काळात दीपक डोबरियाल दबंग चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

पुन्हा एकदा तब्बूसोबत दिसणार अजय देवगण
पुन्हा एकदा तब्बूसोबत दिसणार अजय देवगण

भोला हा तमिळ चित्रपटाचा रिमेक
अजय देवगणचा भोला हा चित्रपट तामिळ चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार कार्ती शिवकुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले होते. 2019 मध्ये आलेल्या या क्राईम थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

अजयने शूटिंगच्या वेळी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो गर्दीच्या मध्यभागी विना हेल्मेट स्कूटी चालवताना दिसत आहे.
अजयने शूटिंगच्या वेळी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो गर्दीच्या मध्यभागी विना हेल्मेट स्कूटी चालवताना दिसत आहे.

अजय देवगणच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
सूत्रांनी सांगितल्यानुसार, 'हा चित्रपटही अजय देवगणच्या बॅनरचा आहे. रनवे 34 प्रमाणे हाही बिग बजेट चित्रपट आहे. त्याचे बजेटही 80 ते 100 कोटींचे असणार आहे. कारण अजय देवगण व्हिज्युअली उत्कृष्ट करण्यासाठी भरपूर VFX चा वापर करणार आहे. शिवाय, हा अॅक्शन जॉनरचा चित्रपट आहे. तो शूट करण्यासाठी बरीच तांत्रिक उपकरणे लागतात. या उपकरणांचा दैनंदिन खर्च 13 ते 15 लाख रुपये असतो. कॅमेरे, जिमी जिप, डड बाईक, ट्रॅकिंग कार यासह डझनभर उपकरणांच्या साह्याने विविध दृश्यांचे चित्रीकरण केले जात आहे.

अजयचे आगामी चित्रपट
अजय हा पुढील वर्षी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 18 नोव्हेंबरला 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. याशिवाय अजय लवकरच 'भोला' या साऊथ चित्रपटाचा रिमेक असलेल्या 'कैथी'मध्ये दिसणार आहे. याशिवाय अजय मैदान या क्रीडा ड्रामा दिसणार आहे. पुढील वर्षी अजयचा किट्टी हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. याशिवाय अजय रोहितच्या सिंघम 3 या चित्रपटातही दिसणार आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्ष अजयचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...