आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अभिनेता अजय देवगण दिग्दर्शित ‘मेडे’ चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी बाळगत अजय डिसेंबर 2020 पासून चित्रपटाचे शूटिंग करत होता. चित्रपटाच्या अंतिम शेड्युलमध्ये एप्रिलच्या शेवटी टीम डोहा येथे जाणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अजयने डोहाचे वेळापत्रक थांबवले आहे.
अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. 2020 मध्ये दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. यामुळे अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. आता ते पूर्णपणे ठीक आहे. आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोसही घेतला आहे.
'मेडे' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे
अजय देवगण दिग्दर्शित 'मेड' हा चित्रपट 2015 च्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा डोहा-कोचीची उड्डाणे खराब वातावरणामुळे बंद केली गेली, त्यानंतर ती दक्षिण भारतातील दुसर्या विमानतळावर वळविली गेली होती. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील अनेक विमानतळांवर केले जाणार होते. परंतु कोरोनामुळे हे होऊ शकले नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच अजय यात पायलटची भूमिका वठवणार आहे.
अजय देवगन 'गंगूबाई काठियावाडी'मध्येही दिसणार आहे
अजयच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे म्हणजे तो अखेरचा तानाजी या चित्रपटात दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया', 'मैदान', 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'मेडे' या चित्रपटांचा समावेश आहे. तर अमिताभ बच्चन सध्या रश्मिका मंदानासोबत 'गुडबाय' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.