आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिंघम'ची नवीन प्रॉपर्टी:अजय देवगणने नवीन बंगल्यासाठी घेतले 18.75 कोटींचे कर्ज, अजय-काजोलच्या जुन्या घराजवळच आहे हा नवीन बंगला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 एप्रिल 2021 रोजी अजयने हे कर्ज घेतले आहे.

बॉलिवूडमध्ये 'सिंघम' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता अजय देवगणने अलीकडेच मुंबईतील जुहू परिसरात एक नवीन बंगला खरेदी केला आहे. रिपोर्ट्सनुसार, अजयचा हा नवा आशियाना मुंबईतील जुहू परिसरात आहे. अजय आणि काजोल सध्या शक्ती या बंगल्यात वास्तव्याला असून त्यांचा हा नवीन बंगला याच घराच्या परिसरात आहे. हा बंगला खरेदी करण्यासाठी अजयने 47.5 कोटी रुपये चुकवले असून त्याने अतिरिक्त 18.75 कोटींचे कर्ज घेतल्याचे म्हटले जात आहे. 27 एप्रिल 2021 रोजी अजयने हे कर्ज घेतले आहे.

5130 चौरस फुटांचा आहे नवीन बंगला
अजयचा हा नवीन बंगला 5 हजार 310 चौरस फूट परिसरात पसरलेला आहे. अजय देवगणच्या काही जवळच्या व्यक्तींना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांच्या या बंगल्याच्या किंमतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिअल इस्टेटशी संबंधित सूत्राच्या माहितीनुसार, याची किंमत 60 कोटी इतकी सांगितली जात आहे.

एक वर्षापासून नवीन घराच्या शोधात होते अजय-काजोल
गेल्या वर्षभरापासून काजोल आणि अजय देवगण मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. अखेर त्यांना ते सध्या राहत असलेल्या भागातच हे नवे घरे सापडले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच अजयने या को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीस्थित बंगल्याची डील फायनल केली होती. आणि 7 मे 2021 रोजी विशाल (अजय) देवगण आणि त्याची आई वीणा विरेंद्र देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला आहे. अजय देवगणने बंगल्याचा ताबा घेतला असून सध्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. कारण अजय त्याच्या सध्याच्या बंगल्याच्या री डेव्हलपमेंटसाठी नवीन बंगल्यात शिफ्ट होणार आहे.

अजय देवगणने कमी भावात खरेदी केला बंगला
रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याचे आधीचे मालक भावेश बालकृष्ण वालिया हे आहेत. रिअर इस्टेटशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत 65-70 कोटी इतकी होती. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अजयने हा बंगला कमी भावात खरेदी केला आहे. अजयने या बंगल्यासाठी 2.73 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले आहेत.

या चित्रपटांमध्ये झळकणार आहे अजय देवगण
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'सूर्यवंशी', 'गंगूबाई काठियावाडी', 'RRR', 'मैदान', 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया', 'थँक गॉड' आणि 'मे डे'चा समावेश आहे. यापैकी 'मे डे' या चित्रपटाचा अजय निर्माता आणि दिग्दर्शक आहे.

बातम्या आणखी आहेत...