आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणचा तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला 'दृश्यम 2':'तान्हाजी' आणि 'गोलमाल अगेन'नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दृश्यम 2' हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस उलटले आहेत, पण तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 196 कोटींची कमाई केली असून आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासह 'दृश्यम 2' अजय देवगणचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. हा चित्रपट आता तान्हाजी आणि गोलमाल अगेनच्या मागे आहे. 'दृश्यम 2'च्या कमाईचा ओघ असाच सुरू राहिल्यास हा चित्रपट गोलमाल अगेनच्या लाइफ टाइम कलेक्शनला मागे टाकू शकतो.

अजय देवगणचा तिसरा सर्वात मोठा चित्रपट

नवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही 'दृश्यम 2'च्या कमाईत फारसा फरक पडलेला नाही. चित्रपट लवकरच 200 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. 'दृश्यम 2' हा अजय देवगणच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी 2020 मध्ये आलेल्या 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने 279.55 कोटींचे लाइफ टाइम कलेक्शन केले होते. यानंतर 2017 मध्ये आलेल्या 'गोलमाल अगेन' या चित्रपटाने 205.69 कोटींचे कलेक्शन केले होते. आता 196.46 कोटींसह 'दृश्यम 2' गोलमाल अगेनचा विक्रम मोडण्याकडे वाटचाल करत आहे.

2022 चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अद्याप 200 कोटींचा आकडा गाठला नसेल, परंतु जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत 284.56 कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे. वर्ल्ड वाइड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट या वर्षातील (2022) सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या चित्रपटाच्या आधी 'ब्रह्मास्त्र' (431 कोटी) आणि 'द काश्मीर फाइल्स' (341 कोटी) यांचा क्रमांक लागतो.

हा चित्रपट केवळ 60 कोटींमध्ये बनला आहे
'दृश्यम 2'चे बजेट जवळपास 60 कोटी होते. या चित्रपटाने तिसर्‍याच दिवशी 64 कोटींचा गल्ला जमवत निर्मिती खर्च वसूल केला होता. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते, परंतु कोविड दरम्यान त्यांचे निधन झाले, त्यामुळे चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही घेतली.

'दृश्यम 2' हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे
'दृश्यम 2' हा साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांचा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट 'दृश्यम 2'चा हिंदी रिमेक आहे. 'दृश्यम'चा पहिला भाग मोहनलाल यांच्या त्याच नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट मल्याळममध्ये बनल्यानंतर अनेक भाषांमध्ये रिक्रिएट करण्यात आला. दोन्ही मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले होते.

हेही वाचा...

  • अवघ्या एका मिनिटात रिव्ह्यू:अक्षय खन्नाने 'दृश्यम 2'मध्ये आणला ट्विस्ट, उत्कृष्ट संवाद, सस्पेन्स आणि ड्रामाने चित्रपट परिपूर्ण

यंदा साऊथ चित्रपटांचे फार कमी उत्कृष्ट हिंदी रिमेक बनले आहेत. 'दृश्यम 2' हा चित्रपट सर्वच बाबतीत उजवा ठरला आहे. गेल्या वर्षी मोहनलाल यांचा 'दृश्यम 2' अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला होता. यावर्षी त्याचा हिंदी रिमेक अभिषेक पाठकने बनवला. साहजिकच 'दृश्यम' फ्रँचायझीचा दर्जा कसा टिकवायचा याची जबाबदारी आणि आव्हान त्याच्यासमोर होते. या चाचणीत अभिषेक पाठक उत्तीर्ण झाला आहे. चित्रपटाला त्याने 100 टक्के न्याय दिला आहे. त्याचा सहकारी लेखक अमिल याचेही पूर्ण सहकार्य त्याला लाभले आहे. वाचा सविस्तर रिव्ह्यू आणि सोबतच बघा व्हिडिओ...

  • दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे 'दृश्यम 2':सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिक्वेल चित्रपटांच्या यादीत टॉप-10 मध्ये पटकावले स्थान

अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' लवकरच भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 160 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाने आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या बॉलिवूड सिक्वेल चित्रपटांच्या टॉप-10 यादीत स्थान पटकावले आहे. या यादीत सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 'दृश्यम 2' हा 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. सर्वाधिक कलेक्शन करणा-या टॉप-10 सिक्वेल चित्रपटांच्या यादीत सामील

  • इंटरव्ह्यू:अजय देवगण म्हणतो,‘दृश्यम 2’मध्ये पुन्हा विजय बनणे सोपे ठरले; पात्र आत्मसात केले होते, सात वर्षांपूर्वीच बीजारोपण

अजय देवगणचा ‘दृश्यम २’ आज प्रदर्शित होत आहे. मोहनलाल अभिनित हा मूळ चित्रपट गेल्यावर्षीच आला होता. मात्र त्याने तो पाहिला नाही. दैनिक भास्करशी मारलेल्या खास गप्पांमध्ये अजयने आपले पात्र आणि रिमेक चित्रपटांबाबत चर्चा केली. वाचा संपूर्ण मुलाखत...

बातम्या आणखी आहेत...