आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगुबाई काठियावाडी:संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात डॉन करीम लालाची भूमिका वठवणार अजय देवगण, 10 दिवसांत शूट करणार सीक्वेन्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवघ्या 10 दिवसांत अजय त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे.

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील अभिनेता अजय देगवणच्या भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आला आहे. या चित्रपटात अजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाची भूमिका वठवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अवघ्या 10 दिवसांत अजय त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. आणि यासंदर्भात बोलणी पूर्ण झाली आहे.

सध्या अजय त्याच्या आगामी 'मे डे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात काम करण्यासोबतच अजयने चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 'मे डे'चे काम पूर्ण झाल्यानंतर अजय गंगुबाई काठियावीडच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल.

'मे डे' या चित्रपटात अजयसह अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवरुन अजय आणि अमिताभ यांची काही छायाचित्रे समोर आली होती. मुंबईत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. चित्रपटात अजय एका वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सेटवरुन समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये बिग बी वकीलाच्या भूमिकेत असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे 'गंगुबाई काठियावाडी'
हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले. या चित्रपटात आलिया आणि अजय देवगण यांच्यासह शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट यावर्षी दिवाळीत रिलीज होऊ शकतो.