आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता यमदूताच्या भूमिकेत अजय देवगण:‘थँक गॉड’मध्ये यमलोकाची कहाणी; 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '3 इडियट्स'प्रमाणे प्रेक्षकांना हसवणार असल्याचा दावा

उमेशकुमार उपाध्याय9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामान्य माणसाच्या गेटअपमध्ये दिसणार

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत यांच्या भूमिका असलेला आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करत आहेत. भूषण कुमार आणि आनंद पंडित हे दोघे निर्माते आहेत. विनोदाचा तडका असणाऱ्या या चित्रपटाबाबत दिव्य मराठीने काही खास माहिती काढली. या चित्रपटात यमलोकातील कहाणी दाखवली जाणार आहे. यात अजय देवगण यमदूताच्या भमिकेत दिसेल. चित्रपटाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे. कोरोना संकट टळल्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.

सामान्य माणसाच्या गेटअपमध्ये दिसणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चित्रपटात बलदंड किंवा रेड्यावर बसलेले यमदूत दाखवले जायचे. या चित्रपटात असे होणार नाही. या भूमिकेसाठी अजयने वजन वगैरेही वाढवले नाही. कारण त्याचा गेटअप सामान्य माणसांसारखा असेल. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची प्रेमकथा दाखवली जाईल. प्रसंगानुसार चित्रपटात चार गाणी असतील. कुठलेही आयटम साँग असणार नाही. चित्रपटाची पटकथा “मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि “3 इडियट्स’ प्रमाणेच रसिकांना खदखदून हसवून एक चांगला संदेश देईल.

35 ते 40 दिवसांचे चित्रीकरण शिल्लक
चित्रपटाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते. ते पूर्ण झाले आहे. हे फक्त 8 ते 10 दिवसांचे छोटे काम होते. या चित्रीकरणात अजय देवगणचा सहभाग नव्हता. चित्रपट निर्माते दुस-या भागाच्या चित्रीकरणाची वाट पाहत होते. अजय दोहा येथे आपल्या दुस-या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. त्यामुळे ‘थँक गॉड’चे चित्रीकरण थोडे लांबले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आणि आता लॉकडाऊनचा फेरा सुरू झाला. त्यामुळे चित्रीकरण बंदच राहिले. चित्रपटाची 35 ते 40 दिवसांचे चित्रीकरण शिल्लक आहे. या पुढेही चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण मुंबईत होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट ओटीटीवर नाही, तर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे नियोजन सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...