आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय चार चित्रपटांमध्ये बिझी:अक्षय कुमारच्या शैलीत काम करताेय अजय देवगण, ‘चाणक्य’च्या आधी पूर्ण करणार या चार चित्रपटांचे चित्रीकरण

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘चाणक्य’साठी प्रोस्थेटिक मेकअप करणार अजय, मात्र आधी ‘मैदान’ आणि ‘मेडे’चे शूटिंग पूर्ण करणार...

इंडस्ट्रीच्या मोठ्या कलाकारांमधून कोरोनाची भीती आता कमी होत चालली आहे. अक्षय कुमार, सलमान खान तर सतत शूटिंग करत आहेत. शाहरुख खाननेदेखील नुकतेच शूटिंग सुरू केले आहे. आता अजय देवगणदेखील अक्षय कुमारच्या शैलीत काम करणार आहे. तो पुढच्या वर्षी ‘चाणक्य’चे शूटिंग सुरू करण्याआधी आपले चार चित्रपट पूर्ण करणार आहे. यात त्याच्या ‘भुज- प्राइड ऑफ इंडिया’, ‘मेडे’, ‘गंगुबाई’ आणि ‘मैदान’चा समावेश आहे.

25 नोव्हेंबरला जाणार संजय

सध्या अजय हैदराबादमध्ये आहे. तो तेथे ‘भुज’चे 10 ते 12 दिवसाचे काम करणार आहे. एकाध दिवस तो आयसोलेट राहून चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. संजय दत्त 25 नोव्हेंबरपासून त्याच्यासोबत शूटिंग सुरू करणार आहे. तो नुकताच दुबईला गेला होता. या चित्रपटाच्या शूटिंग झालेल्या भागाचे पोस्ट प्रॉडक्शन अजयचा भाऊ अनिल देवगण करत होते. त्यांचे नुकतेच निधन झाले.

‘भुज’नंतर ‘मेडे’वर काम करणार अजय
चित्रपटाशी जोडलेल्या सूत्रांनी सांगितले,‘भुज’ची थीम पाहता हा हा चित्रपट हॉट स्टारवर 26 जानेवारीला रिलीज करण्याची टीमची इच्छा आहे. त्यामुळे उरलेल्या भागाचे शूटिंग लवकर संपवण्यात येत आहे. ‘भुज’सोबतच अजय देवगणने हैदराबादमध्ये आपल्या आणखी एका ‘मेडे’ चित्रपटाचा प्लान केला आहे.

मेडेमध्ये अजयसह अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मेडेमध्ये अजयसह अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘भुज’चे शूटिंग पूर्ण होताच अजय याच्या निर्मितीत लागणार आहे. यात अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंहदेखील आहेत. डिसेंबर मध्यापासून याचे शूटिंग सुरू होणार आहे. यात अजय अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही करणार आहेत. अजयने विचार करुन याचे शूटिंग हैदराबादमध्ये ठेवले आहे. जेणेकरुन वेळेची बचत होईल.

‘मैदान’ पूर्ण केल्यानंतर सुरू करणार ‘चाणक्य’

'मैदान' चित्रपटाचे चित्रीकरण लॉकडाउनमुळे रखडले होते.
'मैदान' चित्रपटाचे चित्रीकरण लॉकडाउनमुळे रखडले होते.

‘मेडे’ नंतर अजय आधी बोनी कपूरच्या बॅनरचा ‘मैदान’पूर्ण करणार. लॉकडाउनमुळे त्या चित्रपटातील स्टेडियमचा सेट तोडण्यात आला होता. तेव्हापासून चित्रपटाचे 40 टक्के शूटिंग थांबले होते. यानंतर अजय देवगण ‘चाणक्य’चे शूटिंग सुरू करणार आहे. अजय चाणक्याच्या लूकसाठी प्रोस्थेटिकचा वापर करणार आहे. त्यात रोज दोन ते तीन तास द्यावे लागतात. इतर चित्रपटात त्याचा लूक वेगळा आहे. शिवाय त्याला चित्रपटाचे दिग्दर्शनही करायचे आहे. त्यामुळेच तो शांत चित्ताने चाणक्यावर काम करु पाहत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser