आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दु:खद बातमी:अजय देवगणचा भाऊ अनिल देवगणचे निधन,  2000 मध्ये दिग्दर्शित केला होता पहिला चित्रपट होता 'राजू चाचा'

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असे अजयने म्हटले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते 51 वर्षांचे होते. अजयने मंगळवारी दुपारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे अजयने सांगितले.

अनिल देवगण यांच्या निधनाची माहिती देताना अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगणला कायमचे गमावले. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजय देवगण फिल्म्स आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कोरोनामुळे प्रार्थना सभा घेण्यात येणार नाहीये,' असे अजयने ट्विटमध्ये सांगितले.

अजयच्या बर्‍याच चित्रपटाचे होते सहाय्यक दिग्दर्शक
अनिल देवगण यांनी आपल्या कारकीर्दीतील बहुतेक काम अजय देवगणसोबत केले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. 1996 मध्ये आलेल्या 'जीत' या चित्रपटाव्यतिरिक्त अजय देवगणच्या जान, इतिहास, प्यार तो होना ही था आणि हिंदुस्थानच्या कसम या चित्रपटांचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते.

अजय देवगणचे दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते
2000 मध्ये अनिल यांनी दिग्दर्शक म्हणून 'राजू चाचा' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 2005 मध्ये 'ब्लॅकमेल' आणि 2008 मध्ये 'हाय-ए-दिल' या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 'ब्लॅकमेल' मध्ये अजय मुख्य भूमिकेत होता. अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचे ते क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.

अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक
अजय देवगणच्या ट्विटवर इंडस्ट्रीशी संबंधित अनेकांनी प्रतिक्रिया देताना अनिल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिषेक बच्चन, बोनी कपूर, आयशा श्रॉफ आणि मुकेश छाब्रा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ यांनी अजय देवगण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ यांनी अजय देवगण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दिग्दर्शक बोनी कपूर यांनी वाहिली श्रद्धांजली
दिग्दर्शक बोनी कपूर यांनी वाहिली श्रद्धांजली
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांचे ट्विट
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांचे ट्विट
अभिनेता अभिषेक बच्चनचे ट्विट
अभिनेता अभिषेक बच्चनचे ट्विट
बातम्या आणखी आहेत...