आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडच्या 5 न्यूज एका क्लिकवर:16 वर्षांनंतर आता टीव्हीवर रिलीज होणार अजय देवगणाचा 'हा' चित्रपट, शूटिंगसाठी अलीबागला पोहोचली दीपिका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडच्या चर्चेतील 5 बातम्या वाचा येथे...
  • अजयच्या ‘मेडे’मध्ये झाली अंगिरा धरची एंट्री

अजय देवगण तिसऱ्यांदा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात तो अमिताभ बच्चनसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. आता या चित्रपटात एका उत्कृष्ट अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. नेटफ्लिक्स चित्रपट ‘लव पर स्क्वायर फुट’ मधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंगिरा धरला आता बिग बी आणि अजय सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटात अंगिराची भूमिकार खूपच दमदार असल्याचे बोलले जात आहे. अंगिरा यात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी अंगिरा म्हणाली, इंडस्ट्रीचे दोन दिग्गज अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने खुश आहे.

  • शकुन बत्राच्या चित्रपटासाठी अलीबागला पोहोचली दीपिका

गेल्या काही महिन्यांपासून दीपिका पादुकोण सतत शूटिंग करत आहे. दिग्दर्शक शकुन बत्राच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटात ती लवकरच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले वेळापत्रक गोव्यात पूर्ण झाले. दुसरे वेळापत्रक अलिबागमध्ये सुरू झाले. जिथे सिद्धांत आणि अनन्या आधीच दाखल झाले आहेत. नुकतीच दीपिका मुंबई विमानतळावर दिसली तिथून ती अलीबागकडे रवाना झाली. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

  • सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थाडम’ गेला थंड्या बस्त्यात

सिद्धार्थ मल्होत्रा तामिळ चित्रपट ‘थाडम’च्या रिमेकवर काम करत होता. तो यावर लेखन कामही करत होता. चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र आता हा चित्रपट थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ यात दुहेरी भूमिका साकारणार होता. त्याला स्क्रिप्टमध्ये काही उणीव जाणवली. त्यामुळे ऑगस्टपासून दिग्दर्शक वर्धन केतकरसोबत स्वत: स्क्रिप्टवर काम करत होता. स्क्रिप्टचे बरेच ड्राफ्टदेखील तयार करण्यात आले आहेत. एखाद्या चित्रपटाविषयी थोडाही संशय आला की, तो चित्रपट हातात घ्यायला नको होता, असे आता सिद्धार्थ म्हणत आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि त्याचा निर्माता मुराद खेतानी आणि भूषण कुमार यांनी मिळून या चित्रपटाला होल्डवर टाकले आहे. तिघेही दुसऱ्या चित्रपटावर काम करत आहेत.

  • 2004 मध्ये बनलेला अजयचा 'नाम’ थेट टीव्हीवर रिलीज होणार

बोनी कपूर यांची निर्मित असलेला इट्स माय लाइफ हा चित्रपट अलीकडेच तब्बल 13 वर्षांनी छोट्या पडद्यावर रिलीज करण्यात आला. यात हरमन बावेजा आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. आता अनीस 2004 मध्ये तयार झालेला मात्र अद्याप प्रदर्शित न झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘नाम’. या चित्रपटात अजय देवगण, समीरा रेड्डी आणि भूमिका चावला मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ओटीटी किंवा टीव्हीवरही प्रदर्शित होऊ शकतो. 2004 मध्ये प्रदर्शित केलेला हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. यासाठी प्रियांका चोप्राला प्रथम साइन केले होते पण नंतर समिराने प्रियांकाची जागा घेतली. या चित्रपटाचे निर्माते दिनेश पटेल आहेत, ज्यांनी 1991 मध्ये अजयचा पहिला चित्रपट 'फूल और कांटे' बनवला होता. तो सुपरहिट ठरला होता. यानंतर अजयने मागे वळून पाहिले नाही.

  • आता कृती सेननची बहीण नूपुरला लाँच करतील जॅकी भगनानी

पूजा बेदीची मुलगी अलाया एफला या वर्षाच्या सुरुवातीस युवा निर्माते जॅकी भगनानी यांनी लाँच केले. आता ते कृती सेननची बहीण नुपूर सेननला रुपेरी पडद्यावर सादर करण्याची तयारी करत असल्याचे ऐकिवात आहे.जरी, नुपूर यापूर्वी अक्षय कुमार सोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती पण तिने अद्याप कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. नुपूर तिच्या पदार्पणासाठी विविध कार्यशाळांमध्ये व्यग्र असल्याची चर्चा आहे. नुकतीच ती जॅकीच्या ऑफिसच्या बाहेर दिसली होती. तेव्हापासून हीच चर्चा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser