आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी चित्रपट:‘भुज’चा अनुभव अजय देवगणला ‘मे-डे’मध्ये आला कामी,  या चित्रपटाच्या टायटलचे आहे फ्रेंच कनेक्शन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा महिन्यांत तयार झाला ‘मे-डे’चा सेट
  • 'बाहुबली'चा कला दिग्दर्शक करतोय अजयची मदत

अजय देवगण गेल्या दोन महिन्यांपासून हैदराबादमध्ये आहे. आधी त्याने तेथे ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’चे शूटिंग पूर्ण केले. आता तो स्वत: दिग्दर्शित करत असलेल्या ‘मे-डे’चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सेटवरील प्रॉडक्शन टीमने दिव्य मराठीला काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

सेटवरील सूत्रांनी सांगितले, या चित्रपटाच्या टायटलचे फ्रेंच कनेक्शन आहे. त्यांच्या विमानाच्या पायलटने सर्वात आधी 1920 मध्ये या शब्दाचा वापर केला होता. याचा वापर रेडिओ संपर्काच्या दरम्यान डिस्ट्रेस कॉल म्हणजे अडचणीत असल्याचा संदेश देण्यासाठी होतो. तेथे पायलटची करो या मरोची स्थिती असते. अशा प्रकारे या परिस्थितीत अजयला तंत्रज्ञान आणि थ्रिल दोन्ही दिसले. त्यामुळे अजयने दिग्दर्शनाची धुरा आपल्या हाती घेतली आहे.

  • राजामौलीदेखील करत आहेत मदत

खरं तर, अजयने हैदराबादमध्येच ‘आरआरआर’चे शूटिंग सुरू केले आहे. आता त्याचे दिग्दर्शक एसएस राजामौली ‘मे-डे’च्या शूटिंगमध्ये त्यांची मदत करत आहेत. त्यांनी ‘बाहुबली’चे कला दिग्दर्शक असलेल्या साबू सायरिललादेखील ‘मे-डे’च्या कला दिग्दर्शनासाठी तयार केले आहे. खरं तर, ‘भुज’ आणि ‘आरआरआर’च्या शूटिंगदरम्यान या चित्रपटाचा सेट आणि प्लॅनविषयी चर्चा झाली होती. ‘मे-डे’चा सेट उभारण्यात सहा महिने लागले.

  • मुंबईच्या शेड्यूलमध्ये सहभागी होतील अमिताभ

विशेष म्हणजे यात अजयला आपल्या मागील ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’चा अनुभव कामी आला आहे. कारण त्या चित्रपटातदेखील अजयचे पात्र फायटर प्लेन आणि विमानाशी जोडलेले होते. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी तर अजयचा जुना आणि विश्वासू असीम बजाजच सांभाळत आहेत. तर स्टंट सीनच्या चित्रीकरणासाठी हॉलिवूडमधून अॅक्शन दिग्दर्शक बोलावले. हैदराबाद शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर याचे मुंबईत चित्रीकरण होणार आहे. तेथे अमिताभ बच्चन आपल्या भागाचे शूटिंग करतील.

बातम्या आणखी आहेत...