आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय कुमारनंतर एका पाठोपाठ एक चित्रपटाची शूटिंग करणाऱ्यांमध्ये आता अजय देवगणचे नावदेखील जोडले जात आहे. मागील आठवड्यात त्याने ‘भूज: द प्राइड ऑफ इंडिया’चे शूटिंग पूर्ण केले. यानंतर ‘मे-डे’च्या प्रॉडक्शन टीमसोबत बैठक घेतली. कारण परदेशात शूटिंगची परवानगी मिळाली नसल्याने त्यांनी आता हा चित्रपट मुंबईच्या लोकेशनमध्येच चित्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या महिन्याच्या शेवटी तो आपल्या पहिली सीरिज ‘रूद्र: एज ऑफ डार्कनेस’चे शूटिंगदेखील सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
तंत्रज्ञ टीमने साइन केला शंभर पत्राचा एनडीए
शोविषयी बरीच गोपनीयता बाळगली जात आहे. यासाठी निर्मात्यांनी सर्वच तंत्रज्ञांनासोबत 100 पत्रांचा एनडीए म्हणजे नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंट साइन केले आहे. याअंतर्गत कुठेही शाेची माहिती लीक झाल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.
मुंबईच्या लाइव्ह लोकेशनवर होणार शूटिंग
'रूद्र’चे शूटिंग स्टुडिओमध्ये नव्हे तर मुंबईच्या लाइव्ह लोकेशनवर केले जाईल. यासाठी सध्या मुंबईच्या टाऊन साइडमये तांत्रिक रेकी केली जात आहे. या वेब सीरिजवर िनर्माते प्रचंड पैसा खर्च करणार आहेत. याच्या प्रत्येक भागासाठी 10 ते 15 कोटी रुपये बजेट ठरवले जात असल्याचे बोलले जात आहे.
रामसे ब्रदर्सवर चित्रपट बनवणार अजय
‘रामसे ब्रदर्स’ हॉरर चित्रपटाचे शंहशाह मानले जात होते. रामसे ब्रदर्सने सुमारे 45 चित्रपट बनवले. त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी अजयने अधिकार विकत घेतले. अजय याची निर्मिती प्रीती सिन्हासोबत मिळून करणार आहेत. त्याने सोशल मीडियावर माहिती दिली. त्याने लिहिले...‘प्रीती आणि मी निर्माते या प्राेजेक्टची घोषणा करताना आनंदी आहोत. रामसे कुटुंबाच्या तीन पिढ्यांची जिद्द, दु:ख आणि यशाची अनुठी कथा. लवकरच पडद्यावर’
30 कोटींच्या नफ्यावर विकला 'भूज’
दुसरीकडे अजयने मुंबईत ‘भूज’चे काम पूर्ण केले. यातील सूत्रांनी सांगितले, चित्रपटाचे अधिकार हाॅटस्टारने घेतले आहेत. चित्रपटाच्या निर्मितीवर 120 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला आहे. अजयने 115 दिवस याचे शूटिंग केले. त्यामुळे याचा आणखी जास्त खर्च वाढला. हॉटस्टार 150 कोटीपेक्षा जास्त देणार नव्हता. शिवाय ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत चित्रपटगृह उघडण्याचा काही अंदाज दिसत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी थोड्याशा नफ्यावरच तो हॉस्टस्टारवर विकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.