आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्स रॅकेट:NCB ने अभिनेता एजाज खानला घेतले ताब्यात; बटाटा गँगशी संबंध असल्याचा संशय

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये अनेक ठिकाणी NCB ची छापेमारी

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मंगळवारी अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतले आहे. एजाज काही दिवसांपासून राजस्थानमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, आज मुंबईत दाखल झाल्यावर NCB च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. एजाज कानची एनसीबीकडून चौकशी होणार आहे. एजाज बिग बॉस-7 मध्ये कन्टेस्टेंटसोबत झालेल्या मारहाणीमुळे प्रकाश झोतात आला होता.

NCB सूत्रांनी सांगितले की, एजाज खान आणि ड्रग्सचे मुंबईतील सर्वात मोठे सिंडीकेट म्हणजेच बटाटा गँगशी संबंध आहेत. एजाजला पकडल्यानंतर एनसीबीने मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरात छापेमारीदेखील केली. एजाजला पकडल्यापूर्वी एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला शनिवारी अटक केले आहे.

2018 मध्येही झाली अटक

एजाज खानला यापूर्वी 2018 मध्ये बंदी घातलेली औषधे बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यावेळेस त्याच्याकडून 8 एक्सटेसी टेबलेट मिळाल्या होत्या. याची बाजारातील किंमत 2.2 लाख रुपये होती.

बातम्या आणखी आहेत...