आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:आज संपतेय एजाज खानची कस्टडी, NCB ची आणखी एका TV कलाकाराच्या घरावर धाड; परदेशी गर्लफ्रेंडसह झाला पसार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग पेडलर शादाबला अटक झाल्यानंतरच एजाजचे नाव समोर आले होते.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खानची एनसीबी कस्टडी आज संपतेय. आता एनसीबीने त्याच्याशी संपर्कात असलेल्या इतर टीव्ही कलाकारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, एनसीबीच्या एका पथकाने शुक्रवारी उशिरा रात्री मुंबईतील लोखंडवाला भागातील एका टीव्ही अभिनेत्याच्या घरावर छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने छापा टाकण्यास सुरुवात करण्याच्या काही मिनिटा आधी हा अभिनेता पसार झाला होता. एजाज खानच्या चौकशीनंतर हा छापा टाकण्यात आला होता.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्यासोबत एक परदेशी महिला बर्‍याच दिवसांपासून राहात होती. मात्र ती देखील सध्या फरार झाली आहे. हे दोघे एकत्र पळून गेल्याचे समजते. एनसीबीला या अभिनेत्याच्या घरातून विविध ड्रग्ज आणि एक लॅपटॉप मिळाला आहे.

शादाब बटाटाकडून ड्रग्ज घेऊन एजाज बॉलिवूड सेलिब्रिटींना पुरवायचा
मंगळवारी (30 मार्च) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एजाज खानला राजस्थानहून मुंबई परतल्यानंतर विमानतळावरून ताब्यात घेतले होते. ड्रग पेडलर शादाब बटाटा याला बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर एजाजचे नाव याप्रकरणात समोर आले होते. शादाब बटाटाकडून ड्रग्ज घेऊन एजाज सेलिब्रिटींना ते पुरवत असल्याचे एनसीबीच्या चौकशीतून समोर आले आहे.

एजाजचे बहुतेक क्लायंट टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित
एनसीबीच्या एका अधिका-याने सांगितले की, एजाजचे बहुतेक क्लायंट हे टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित लोक आहेत. त्यांच्यापर्यंत ड्रग्ज पोचवण्यासाठी एजाज व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हॉईस नोट फीचरचा वापर करत असे. ऑर्डर मिळताच तो हे रेकॉर्डिंग डिलीट करायचा. ड्रग्ज संदर्भात, तो आपल्या क्लायंटसोबत सीरियल आणि चित्रपटाचे नावावर तयार केलेल्या कोडमध्ये संवाद साधायचा.

लॉकडाउनच्या नावाखाली जास्त प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्यात सांगितले होते

एनसीबीने कोर्टाला सांगितल्यानुसार, त्यांच्याजवळ एजाज खान आणि शादाब बटाटा यांच्यातील संभाषणाची सीडीआर, व्हॉट्सअॅप चॅट व व्हॉईस रेकॉर्ड आहेत. यात एजाज बटाटाला ड्रग्जची ऑर्डर देत असून पैसे ट्रान्सफर करण्याविषयी बोलत आहेत. बटाटानेदेखील एजाजला ड्रग्ज पुरवत असल्याचे एनसीबीसमोर कुबल केले आहे. लॉकडाउनच्या नावाखाली एजाजने अनेक सेलिब्रिटींनी जास्त प्रमाणात ड्रग्ज खरेदी करुन ठेवण्यास सांगितल्याचे एजाजच्या चॅटमधून समोर आले आहे.

घरातून मिळालेले ड्रग्ज ही एजाजच्या पत्नीची औषधे : वकील

एजाज आपल्या पदाचा गैरफायदा घेत होता आणि हा व्यवसाय तो आपल्या राहत्या घरातून चालवत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मात्र, एजाजचे वकील अयाज खान यांनी कोर्टाला सांगितले की, अभिनेत्याच्या घरातून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाहीत. त्याच्या घरातून Troika नावाचे औषध सापडले आहे, जे त्याच्या पत्नीचे आहे. अयाज खान यांच्या म्हणण्यानुसार, एनसीबीला जी व्हॉइस नोट सापडली आहे, ती वर्षभरापूर्वीची आहे. त्यात केवळ MD चा उल्लेख आहे. एजाजने आपल्या जबाबात ड्रग्जची खरेदी अथवा विक्री केल्याचे कबुल केले नसल्याचे अयाज खान यांनी सांगितले आहे.

2018 मध्ये मुंबई नार्कोटिक्स सेलने केली होती अटक

यापूर्वी एजाज खानला 2018 मध्ये बंदी असलेली औषधे घेत असल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलने अटक केली होती. अटक झाली तेव्हा ते नशेत असल्याचे म्हटले गेले होते. त्याच्याकडून 8 एक्सटेसी गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्याचे वजन 2.3 ग्रॅम आणि किंमत 2.2 लाख रुपये होती. त्या काळात नवी मुंबई पोलिसांनी अभिनेत्याचे दोन मोबाइल फोनही जप्त केले होते. एका हॉटेलमध्ये पार्टी करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...