आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिणेत प्रेक्षक त्यांच्या कलाकारांची देवाप्रमाणे पूजा करतात. तिथले लोक आपल्या आवडत्या स्टारच्या चित्रपटाच्या तिकिटासाठी एक दिवस आधीच रांगेत उभे असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अजित स्टारर 'वलीमाई' आणि पवन कल्याणचा 'भीमला नायक' या चित्रपटांच्या बाबतीत हेच चित्र बघायला मिळाले आहे. अजितचा 'वलीमाई' गुरुवारी तर पवन कल्याणचा 'भीमला नायक' शुक्रवारी प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येत आहे.
परिस्थिती अशी आहे की, चाहते थिएटरमध्ये चक्क चिल्लर आणि नोटा उडवत आहेत. वलीमाईच्या पहिल्या शोला चाहत्यांनी चक्क थिएटरमध्येच आतषबाजी सुरू केली होती. रस्त्यावर फटाकेही फोडण्यात आले. एकीकडे 'वलीमाई'साठी पहाटे 4 वाजल्यापासूनच चित्रपटगृहांबाहेर तिकिटांसाठी रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी 'भीमला नायक'चा पहिला शो पाहिल्यानंतर चाहते रस्त्यावर उतरले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वलीमाईसाठी उशिरा रात्रीच्या शोसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे.
अजितच्या 'वलीमाई'ने पहिल्याच दिवशी केली 62 कोटींची कमाई
'वलीमाई' या चित्रपटाला कोरोना काळात सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 62.36 कोटी आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, त्याचा थेट फायदा चित्रपटाच्या ओपनिंग कलेक्शनला झाला आहे. अजितच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तामिळनाडूमध्ये त्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36 कोटी आहे. त्याचवेळी चेन्नईमध्ये 1.84 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. चेन्नईमध्ये एवढी मोठी ओपनिंग मिळालेला अजितचा हा पहिलाच चित्रपट आहे. ट्रेड पंडितांनी 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'भीमला नायक'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज 102 कोटी वर्तवला आहे.
चाहत्यांनी अजितच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घातला
'वलीमाई' या चित्रपटाबद्दल आणि अजित कुमारबद्दल चाहत्यांची क्रेझ इतकी आहे की, दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये सिनेमा हॉलबाहेर रस्ते जाम झाले. त्यामुळे अनेक मार्ग वळवावे लागले. अनेक व्हिडिओंमध्ये चाहते अजित कुमारच्या मोठ्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालताना दिसले. हुमा कुरेशीचा एक व्हिडिओ देखील समोर आला ज्यामध्ये ती थिएटरबाहेर चाहत्यांची गर्दी पाहून आश्चर्यचकित आणि आनंदी दिसली. वृत्तानुसार, कोईम्बतूरमधील अर्चना थिएटरमध्ये अज्ञात व्यक्तीने अजित कुमार यांच्या चाहत्यांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.