आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री कंगना रनोटचा धाकटा भाऊ अक्षत रनोट गुरुवारी सकाळी 9.15 वाजताच्या मुहूर्तावर रितू सागवानसोबत विवाहबद्ध झाला. अक्षतचे डेस्टिनेशन वेडिंग लेक सिटी उदयपूर येथील द लीला पॅलेस येथे झाले. या लग्नाला रनोट आणि सागवान कुटुंबातील निवडक लोकांची उपस्थिती होती.
द लीला पॅलेस येथे होणार रिसेप्शन
आज संध्याकाळी अक्षत आणि रितूच्या लग्नाचे रिसेप्शन उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये होणार आहे. या वेडिंग रिस्पेशनमध्ये राजस्थानी पदार्थांसोबत देशी परदेशी पदार्थांची रेलचेल असेल.
अभिनेत्री कंगना पारंपारिक दागिन्यांमध्ये दिसली.
कंगनाने जांभळा आणि निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
कंगना तयार करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट मुंबईहून आले होते.
रनोट कुटुंबीय कुल देवीच्या दर्शनाला जाणार
अक्षत आणि रितूच्या लग्नानंतर रनोट कुटुंबातील सदस्य कुलदेवी माँ अंबिकाच्या दर्शनाला जाणार आहेत. उदयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर जगत गावात रनोट कुटुंबीयांच्या कुलदेवीचे मंदिर आहे.
राजस्थानी थीमवर झाले लग्न
अक्षत आणि रितू सगवान यांच्या लग्नाची थीम राजस्थानी रजवाडी होती. त्या अंतर्गत हॉटेलचा परिसर राजस्थानी थीमवर सजवण्यात आला होता. तसेच राजस्थानी कलाकारांनी सादरीकरण केले.
नवदाम्पत्य अक्षत आणि रितू
कंगना भाऊ अक्षतसोबत.
कंगना रनोट चिमुकल्यांसोबत रमली.
कुटुंबासमवेत कंगना रनोट.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.