आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयचा 53 वा वाढदिवस:कमाईच्या बाबतीत जगातील टॉप 100 सेलिब्रिटींमध्ये सामील आहे अक्षय कुमारचे नाव, चित्रपटांमध्ये घेतो 50 टक्क्यांपर्यंत प्रॉफिट शेअरिंग

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय यंदा आपल्या वाढदिवशी स्कॉटलंडमध्ये 'बेलबॉटम' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.
  • अक्षयचा मागील चित्रपट 'गुड न्यूज' हा होता.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थातच अभिनेता अक्षय कुमार आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. ब-याच संघर्षानंतर अक्षयने चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच वर्षीच्या फोर्ब्सच्या जगातील हाइएस्ट पेड -100 सेलिब्रिटींच्या यादीमध्ये भारतातून एकमेव अक्षय कुमारचे नाव होते. तसं पाहता, गेल्या एका वर्षात अक्षयची कमाई 22% घटून 364 कोटी रुपये (4.84 कोटी डॉलर्स) झाली. या यादीमध्ये तो 33 व्या क्रमांकावरुन 52 व्या स्थानावर घसरला. गेल्या वर्षी अक्षयचे उत्पन्न 466 कोटी रुपये होते.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अक्षय बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. अक्षयला भारताच्या सर्वात मोठ्या देणगीदार सेलिब्रिटींमध्येही फोर्ब्सने स्थान दिले आहे. त्याने कोरोना रिलीफ फंडाला 25 कोटी रुपये दिले होते.

  • गेल्या वर्षीही अक्षय फोर्ब्सच्या यादीतील एकमेव भारतीय होता

गेल्या वर्षी सर्वाधिक मानधन घेणा-या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत भारतातील एकमेव अक्षय कुमारचे नाव होते. गेल्या वर्षी सलमान खान या यादीतून बाहेर पडला होता. 2017 नंतर शाहरुखला या यादीत स्थान मिळवता आले नाही. 2018 पर्यंत अक्षय एका चित्रपटासाठी 27 कोटी रुपये घ्यायचा. 2019 मध्ये त्याची फी वाढून 54 कोटी इतकी झाली. बर्‍याच चित्रपटांमध्ये तो फी न घेता नफा शेअर करतो. रुस्तम (2016) साठी अक्षयने 50% प्रॉफिट शेअरिंग डीलवर सही केली होती.

  • 742 कोटींची आहे ब्रँड व्हॅल्यू

डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन स्टडी 2019 नुसार, अक्षयची ब्रँड व्हॅल्यू 742 कोटी रुपये आहे. या ब्रँड व्हॅल्यूमध्ये अक्षयच्या प्रिंट, डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंग, ब्रँड अ‍ॅडव्हर्टायझिंग, सोशल मीडिया प्रमोशनल पार्टनरशिपमधून मिळणारी कमाई यांचा समावेश होता. रिपोर्ट्सनुसार, अक्षय ब्रँड अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी प्रती दिवस दोन ते तीन कोटी रुपये फी घेतो. सध्या अक्षय जवळपास 30 ब्रँडशी जुळला आहे.

बातम्या आणखी आहेत...