आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लक्ष्मी बॉम्ब'चे ट्रेलर रिलीज:हॉरर-कॉमेडीमधून अक्षयची धमाकेदार एंट्री, किआराच्या घरच्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात घेतला भुताशी पंगा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार आणि किआरा आडवाणी स्टारर अपकमिंग हॉरर-कॉमेडी फिल्म 'लक्ष्मी बॉम्ब'चे ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाले. ट्रेलरमध्ये अक्षय त्याच्या मस्त कॉमेडी स्टाईलमध्ये दिसत आहे. 3 मिनीट 40 सेकंदाच्या या ट्रेलरमधून तुम्हाला अक्षयच्या 'भूल भूलैया' आणि राजकुमार रावची 'स्त्री' चित्रपटाची आठवण येईल. हा चित्रपट येत्या 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे.

ट्रेलर शेअर करत अक्षय कुमारने लिहीले, 'जिते कुठे असाल, तिथे थांबा आणि तयार व्हा पाहण्यासाठी #लक्ष्मी बॉम्बचे ट्रेलर #ही दिवाळी लक्ष्मी बॉम्बची दिवाळी.' ट्रेलरमध्ये अक्षयचा पहिला डायलॉग आहे, 'जिस दिन सच में मेरे सामने भूत आया ना.. तो मां कसम सच में चूड़ियां पहन लूंगा चूड़ियां'।

तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे लक्ष्मी बॉम्ब

या चित्रपटात अक्षय आणि किआरासोबतच तुषार कपूर, शरद केळकर, अश्विनी काळसेकरसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे दिद्गर्शन राघव लॉरेंसने केले आहे. हा चित्रपट राघव यांच्या तमिळ 'कांचना'चा हिंदी रीमेक आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' 22 मे 2020 ला रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser